Shivajirao Patil News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातील भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलेने आमदार पाटील यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पैशांची मागणी केली. आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आमदार पाटील यांच्या तक्रारीनुसार, संबंधित अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून आमदार पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. नेहमी वेगवेगळ्या क्रमांकावरून आमदार पाटील यांना फोनवरून मेसेज करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीच्या काळात मेसेजद्वारे मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मैत्रीची इच्छा व्यक्त करत संवाद वाढवल्यानंतर संबंधित महिलेने आमदार पाटील यांना अश्लील फोटो पाठवले.
या संपूर्ण प्रकरणानंतर त्या महिलेने आमदार पाटील यांच्याकडे कधी एक लाख तर कधी दोन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी दहा लाखांची मागणी केली. पण वारंवार हा त्रास वाढत असल्याने आमदार पाटील यांनी त्या महिलेला ब्लॉक केले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्या महिलेने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत अश्लील छायाचित्र आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. तसेच पैसे नाही दिले तर पोलिसात तक्रार देईन अशी धमकीच संबंधित महिलेने आमदार पाटील यांना दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलीस ठाण्यात 8 ऑक्टोबर रोजी या महिले संदर्भात तक्रार दिली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.