MLC Election News : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी काँटे की टक्कर ; परब,डावखरे, शेलार यांच्यासह उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत 'लॉक'

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या दोन शिक्षक तर दोन पदवीधर अशा एकूण 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.
Legislative Council Election
Legislative Council Electionsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : महाराष्ट्रविधान परिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी (ता.26 )मतदान प्रक्रिया पार पडली. यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे.तर दुसरीकडे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ,तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. या चारही मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

विधान परिषदेच्या दोन शिक्षक तर दोन पदवीधर अशा एकूण 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.या चार मतदारसंघातील उमेदवारांकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु करण्यात आले. मतदानाची 6 वाजेपर्यंतची आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून दिली आहे. आज झालेल्या मतदानात अनिल परब, किरण शेलार, निरंजन डावखरे यांसह अनेक दिग्गज नेत्यांंचं भवितव्य मतपेटीत बंद झाले.

कोकण पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 63.00 टक्के तर मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 56.00 टक्के इतकी राहिली आहे.मुंबई शिक्षक मतदारसंघाची सायंकाळी 6 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी 75.00 तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी 93.48 टक्के इतकी आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत.देण्यात आले आहेत.तर,कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे.

Legislative Council Election
Kapil Patil News: नेहमीच सरकारवर तुटून पडणाऱ्या कपिल पाटलांची आज चक्क चहापानाला हजेरी; त्यांनीच सांगितले कारण..

तर महायुतीत भाजपकडून मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर या जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत.मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. तर, नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत होत आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाच्या ज. मो. अभ्यंकर विरुद्ध भाजपच्या शिवनाथ दराडे

शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांच्यात थेट लढत होत आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर हे रिंगणात आहे.

Legislative Council Election
Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांना मदत की...; अजितदादांनी पत्रकार परिषदेतच शिंदेंना लिहून दिली चिठ्ठी; चर्चांना उधाण

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटाचे किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे मैदानात असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com