Raj Thackeray News : अखेर राज ठाकरे पीएम मोदींवर बोललेच; म्हणाले...

Political News : बोरीवलीतील सभेतून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित पवारांसोबत सोबत घेतल्यावरुन मिश्कील टोला लगावला.
Raj Thackeray - Narendra Modi
Raj Thackeray - Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसाचाच अवधी उरला आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. प्रचार आता शिगेला पोहचला असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत आली आहे. त्यातच मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी बोरीवलीतील सभेतून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित पवारांसोबत सोबत घेतल्यावरुन मिश्कील टोला लगावला. (Raj Thackeray News)

बोरीवली विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा होत असताना फटाके वाजवण्यावरुन ते चिडल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंचं भाषण सुरु होतानाच फटाक्यांचा आवाज सुरू झालाय. या फटाक्यांचा आवाज आल्याने राज ठाकरे चिडल्याचं पाहायला मिळाले. सभेपूर्वी उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांवरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Raj Thackeray - Narendra Modi
Uddhav Thackeray Sabha : सांगोल्याच्या गद्दाराचा माज उतरवायला अन गाडायला मी आलोय; उद्धव ठाकरेंचा शहाजीबापूंवर घाणाघात

गेल्या दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले. त्यावेळेस त्यांच्याबाबत दहा दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितलं होतं की, ज्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला त्यांना आम्ही सोडणार नाही. सोडणार नाही याचा अर्थ आता कळला अच्छा असे सोडणार नाही का धरून ठेवलं, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी यांनी यावेळी लगावला.

Raj Thackeray - Narendra Modi
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारणांनाच कॅरेक्टर उरलं नाही तर शहरांना कुठून येणार? त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाही. आतापर्यंत कोण कोण आमदार नगरसेवक खासदार होऊन गेले त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्या की हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. कारण, तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे पण त्यांना भीतीच उरली नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला.

Raj Thackeray - Narendra Modi
Vinod Tawde: मोदींच्या 'फेव्हरेट नेत्याचा' मोठा दावा; अजित पवारांना विधानसभेला किती जागा मिळणार? थेट आकडाच सांगितला

तुम्हाला उत्तम आमदार निवडता आला पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कै. बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला येतात. पण तुम्हाला प्रश्न पडत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मतदान केलं पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केलं पण आपल्या बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे?. पाच वर्ष कशाला म्हणतात कळतं का? नुसता शिक्षित मतदार नाही चालत तर सुज्ञ मतदार पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले. तुम्हाला उत्तम शहरं मिळू शकतात, फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडता आला पाहिजे.

Raj Thackeray - Narendra Modi
Ajit Pawar : गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला; अजित पवार-जयंत पाटलांमध्ये वार- पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com