Amar Kale : अमित शाह शरद पवार भेटीमागचे सत्य काय? 'या' खासदाराने सांगितली 'इनसाईड स्टोरी'

MP Amar Kale Amit Shah did not meet Sharad Pawar : अमर काळे म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत जाण्याची चर्चा आमची पक्षाच्या पातळीवर कुठेही कधीच झाली नाही.
amit shah sharad pawar
amit shah, sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Amar Kale News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच अमित शाह यांनी देखील शरद पवारांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याने शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर शरद पवारांचे खासदार अमर काळे यांनी शरद पवारांच्या वाढदिवास दिवशी काय घडले हे सांगितले आहे.

काळे म्हणाले, 'अजित पवार यांच्यासोबत जाण्याची चर्चा आमची पक्षाच्या पातळीवर कुठेही कधीच झाली नाही.आम्ही शरद पवार यांना एवढ्या वेळा भेटलो मात्र अजित पवार यांच्यासोबत जायचे या मुद्यावर आमची कधीच चर्चा झाली नाही. ज्या बातम्या दिल्या जात आहेत त्यामुळे आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न केले जातात. त्यामुळे बातम्या देताना त्यातील सत्यता तपासली जावी.'

amit shah sharad pawar
Maharashtra Law and Order: अपहरण, खून, खंडणी अन् गोळीबार...; महाराष्ट्रात 'खाकी वर्दी'चा धाक खरंच उरलाय ?

अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा असताना खासदार काळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, काल शरद पवार यांचा वाढदिवस होता.आम्ही तिथे सात तास सोबत होतो. त्यामुळं तिथं भेट झाली नाही हे मी दाव्याने सांगतो. भेटीच्या चर्चा फक्त मीडियामध्ये सुरू आहेत. अशी भेट झाली या बातमीत काही तथ्य नाही.

आमचा पवारसाहेबांसोबतच

संजय राऊत यांनी शरद पवार यांचे खासदार फोडून केंद्रात मंत्रिपद मिळवण्याची ऑफर अजित पवारांना भाजपने दिली असल्याचे म्हटले आहे. त्यावर अमर काळे म्हणाले, संजय राऊत कुठल्या आधारावर बोलतात हे माहीत नाही. ते आमच्या पक्षाकडून बोलतात हा चिंतनाचा विषय आहे. 5 खासदार फोडले तर मंत्रिपद हे प्रपोजल कुठेही आले नाही. शरद पवार जो निर्णय घेतील त्या सोबत आमचे 8 लोक (खासदार) असतील

amit shah sharad pawar
Chandrashekhar Bawankule : 'हिंदुत्व आमचं श्रध्दा, प्राण आणि श्वास'; ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळे आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com