Waqf Board Amendment Bill Latest Update : वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उद्धव ठाकरेंचा 'तो' खासदार गैरहजर! संजय राऊतांनी सांगितले खरे कारण

Waqf Board Amendment Bill Latest Update Sanjay Raut Nagesh Ashtikar : लोकसभेत शिवसेनेचे 9 खासदार आहेत. मात्र, मतदानाच्या वेळी एक खासदार गैरहजर होता. संजय राऊत यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.
uddhav thackeray sanjay raut
uddhav thackeray sanjay rautsarkarnma
Published on
Updated on

Shivsena UBT : लोकसभेमध्ये बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावर मतदान झाले. विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर, विरोधात 232 मते पडली. हे विधेयक लोकसभेत मंजुर झाले असून त्यावर आज (गुरुवारी) राज्यसभेत मतदान होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले

लोकसभेत शिवसेनेचे 9 खासदार आहेत. मात्र, मतदानाच्या वेळी एक खासदार गैरहजर होता. संजय राऊत यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभेत मतदानाच्या वेळी गैरहजर होते.

खासदार आष्टीकर गैरहजर असण्यामागचे कारण देखील संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे काल गैरहजर होते. कारण ते रुग्णालयात दाखल आहे. त्यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे ते काल उपस्थित राहू शकले नाहीत.

uddhav thackeray sanjay raut
Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ सुधारणा बिलावर चर्चा; अमित शहांनी थेट सभागृहात दिला कोल्हापुरातील 'या' मंदिराचा दाखला

संजय राऊत म्हणाले, काल तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण ऐकले असेल तर तुम्हाला कळेल की मोहम्मद अली जीना यांनी देखील मुस्लिमांचे येवढे लांगुलचालन केले नसेल तेवढे अमित शाह यांनी केले. त्यांनी लोकसभेतच सांगितले की त्यांनी मुस्लिमांसाठी काय काय केले. पण त्यांनी वक्फ विधेयक हे जमीनीचे व्यवहार करण्यासाठी आणले असल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येते.

लोकसभेत 273 हा बहुमताचा आकडा आहे. विरोधी पक्ष एकजुटीने उभे होते. ते 300 पार करू शकले नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

टॅरिफवरून लक्ष वळवण्याचे प्रयत्न

संजय राऊत म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफची घोषणा करणारे होते म्हणूनच कालचा दिवस हा वक्फ विधेयकासाठी निवडला गेला. जेणे करून टॅरिफच्या घोषणेकडे लक्ष जाऊ नये. तब्बल 26 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद पडले, अर्थव्यव्यवस्थेवर परिणाम होईल. आर्थिक अराजक माजवणाऱ्या निर्णयापासून लक्ष विचलीत करण्यासाठी वक्फच्या विधेयकासाठी कालचा दिवस निवडला.

uddhav thackeray sanjay raut
Donald Trump Tariff : दोस्तीत कुस्ती! PM नरेंद्र मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर टॅरिफ हल्ला, तब्बल 26 टक्के कर लावला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com