MPSC Exam : "नियम 45 दिवसांचा… मग परीक्षा 30 दिवसात कशी?" MPSC वर उमेदवारांचा संताप; परीक्षेची तारीख बदलणार?

mpsc mains exam : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल लागण्यानंतर एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी होत आहे.
mpsc mains exam
mpsc mains examsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा निकाल 90 दिवसांनी जाहीर झाला.

  2. मुख्य परीक्षा 29 मार्च रोजी होणार असून उमेदवारांना केवळ 30 दिवसांचा तयारीचा कालावधी मिळत आहे.

  3. तारखेत बदल करण्याबाबत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News : राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच लागला आहे. या निकालामुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता मुख्य परीक्षा २९ मार्चला होणार असल्याने नवे संकट विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झाले असून त्यांची तारांबळ उडाली आहे. तब्बल ९० दिवसांनी निकाल जाहीर होताच मुख्य परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

यामुळे केवळ ३० दिवसांच्या कालावधीत मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा असा सवाल आता विद्यार्थी करताना दिसत आहेत. तर निकालानंतर किमान ४५ दिवसांचा अवधी असणे असा नियम असताना मुख्य परीक्षेसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर परीक्षेच्या तयारीसाठी मुख्य परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी होत आहे. यामुळे तीन दिवसांनी एमपीएससीची उच्चस्तरीय बैठक होणार असून मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकताच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल लागला. ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती. तर परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. यानंतर एमपीएससीकडून महिना उलटूनही निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. दरम्यान राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित असताना आता हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

mpsc mains exam
MPSC Exam Rescheduled : नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निकालाचा परिणाम, एमपीएससीने परीक्षेची तारीख बदलली; आता जानेवारी महिन्यात पेपर

याविलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर सखोल अभ्यासासाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी हातात आहे. यातच वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षा असल्याने ही तयारी करणे अशक्य असल्याचे उत्तीर्ण उमेदवारांचे म्हणणे आहे. तर अशा पद्धतीने ३० दिवसांवर परीक्षा आणत आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोपही उत्तीर्ण उमेदवारांनी केला आहे. तसेच मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे.

मुख्य उद्देश

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ‘वर्णनात्मक’ पद्धत लागू करण्यामागे मुख्य उद्देश हा यूपीएससी मधील टक्का वाढवणे आहे. मात्र, दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात ताळमेळ नसल्याने हा उद्देशसच साध्य होत नसल्याचे आता समोर येत आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा आणि यूपीएससी पूर्व परीक्षा यांच्या तारखा जवळ जवळ किंवा एकाच वेळी आल्या तर विद्यार्थ्यांची ओढाताण होणार आहे. अभ्यासाचा समतोल: राखत मुख्य परीक्षेच्या सखोल लेखी सरावामुळे पूर्व परीक्षेच्या ‘ऑब्जेक्टिव्ह’ तयारीकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे म्हणणे विद्यार्थ्यांचे आहे.

पण आयोगाने भविष्यातील परीक्षांचे वेळापत्रक यूपीएससीच्या परीक्षेच्या तारखांवर बनवले. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेनंतर एमपीएससी मुख्य परीक्षा आयोजित केल्यास हा उद्देश साध्य करता येणार आहे. याचे अनेक फायदेही विद्यार्थ्यांना मिळतील. विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेवर पाणी न सोडता दोन्ही परीक्षांची तयारी करता येईल.

mpsc mains exam
MPSC Exam : MPSC राज्यसेवा परीक्षा घेण्यावर ठाम! अतिवृष्टीचा विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, आयोगाने थेट 'ते' परिपत्रकच जारी केलं

FAQs :

1. एमपीएससी पूर्व परीक्षा 2025 चा निकाल किती दिवसांनी लागला?
निकाल सुमारे 90 दिवसांच्या विलंबानंतर जाहीर करण्यात आला.

2. मुख्य परीक्षा कधी होणार आहे?
मुख्य परीक्षा 29 मार्च रोजी नियोजित आहे.

3. उमेदवारांची मुख्य मागणी काय आहे?
मुख्य परीक्षा पुढे ढकलून किमान 45 दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी होत आहे.

4. नियमांनुसार किती दिवसांचा कालावधी आवश्यक असतो?
निकालानंतर किमान 45 दिवसांचा कालावधी देणे अपेक्षित असते.

5. पुढील निर्णय कधी होऊ शकतो?
तीन दिवसांनी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीनंतर परीक्षेच्या तारखेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com