MPSC Paper Leak : CM फडणवीसांवरचे आरोप हर्षवर्धन सपकाळांना भोवणार; भाजप आमदाराचा कायदेशीर कारवाईचा इशारा

Harshvardhan Sapkal on MPSC paper leak: विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना सरकारविरोधात भडकवण्याचे काही लोकांचे प्रयत्न वारंवार निष्फळ ठरले आहेत, असे देखील अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
MPSC paper leak allegations against Devendra Fadnavis
MPSC paper leak allegations against Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Abhimanyu Pawar News: MPSC अन्न व औषध निरीक्षक पेपर फुटीबाबात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी गंभीर आरोप केला होता. या पेपरफुटी प्रकरणाचा आका देवेंद्र फडणवीसच असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडेही संशयाईची सुई असल्याचे म्हटले होते. त्याला आता अभिमन्यू पवार यांनी प्रत्युत्तर देत थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

पवार म्हणाले की,'अफवेबाज सपकाळ यांच्या बिनबुडाच्या आरोपांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी औषध निरीक्षक भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणाशी माझा संबंध जोडत माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार, हास्यास्पद आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मुळात त्यांना हा तथाकथित “जावईशोध” नेमका कुठून लागला, हेच समजण्यापलीकडचे आहे. पेपरफुटीचा कायदा करणाऱ्या देवेंद्रजींवरही पेपरफुटीबाबत आरोप करणाऱ्या सपकाळ यांच्या बुद्धीची कीव येते.'

'गेली अनेक वर्षे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आलो आहे. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना सरकारविरोधात भडकवण्याचे काही लोकांचे प्रयत्न वारंवार निष्फळ ठरले आहेत.', असे देखील अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

MPSC paper leak allegations against Devendra Fadnavis
Ashok Chavan : कधीकाळी भाजपच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद गमावलं... त्याच भाजप सरकारच्या बचावासाठी अशोक चव्हाण मैदानात

पुढे ते म्हटले की,'विद्यार्थ्यांमध्ये माझ्याविषयी असलेला विश्वास आणि सकारात्मक प्रतिमा काही जणांना खटकत असल्याचे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहे. आजचा हा आरोपही त्याचाच एक भाग असावा. माझ्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ तसेच विरोधी पक्षातील काही नेत्यांना राजकीय आक्षेप असू शकतो, हे मी समजू शकतो. मात्र कोणताही पुरावा नसताना केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारचे आरोप करणे, हा त्यांच्या राजकारणाचा घसरलेला स्तर दर्शवणारा प्रकार आहे.'

कायदेशीर मार्गाचा अवलंब...

सपकाळ यांनी सार्वजनिकरित्या आरोप केले आहेत, त्यामुळे ते सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. माझी बदनामी करण्याच्या या प्रकाराविरोधात मी तात्काळ कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे.

राहिला प्रश्न औषध निरीक्षक भरतीच्या कथित पेपरफुटीचा....तक्रारदाराने तक्रार मागे घेतली असली, तरी आयोगाकडे सादर करण्यात आलेले तक्रार पत्र, उपलब्ध स्क्रीनशॉट तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंका यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मी यापूर्वीच केली आहे, असे त्यांनी सांगितले.

लवकरात लवकर चौकशी करून आयोग वस्तुस्थिती समोर आणेल आणि चौकशीनंतर उचित कार्यवाही करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे सांगत पवार यांनी मी MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून दूर राहावे अशी तुमची कितीही इच्छा असली तरी मी विद्यार्थ्यांसाठी काम करत राहीन, असा टोला विरोधकांना लगावला.

MPSC paper leak allegations against Devendra Fadnavis
Harshvardhan Sapkal: 'फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही'; सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com