

MPSC Exam Controversy: MPSC परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी दिसून येत आहे. याचा निषेध म्हणून MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सोमवारी पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. या मोर्चात विद्यार्थ्याचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासोबतच परीक्षा प्रक्रियेत विविध सुधारणा व्हाव्यात अशा विविध मागण्या करण्यात आल्या. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेत परीक्षा सुधारणेसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स समिती स्थापन केली आहे. राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये जाऊन ही समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. या संवादातून मिळणाऱ्या सूचना आणि तक्रारींच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रियेत कोणते बदल करायचे, याबाबत ही समिती सरकारला भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखणे, परीक्षा सुरक्षेत सुधारणा करणे, प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक कशा होतील यासाठी शिफारस करणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील ही उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीची निर्मिती करण्यात आली आहे. या समितीत राज्याच्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या समितीद्वारे राज्यातील सहा विभागांना भेट देत भरती परीक्षांमधील विविध गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षा व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, पारदर्शकता आणि उमेदवारांच्या तक्रारी यांसारख्या बाबींवर अभ्यास करून समितीद्वारे सरकारला सुधारणा सुचविल्या जाणार आहेत.
टास्क फोर्सच्या या संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखणे, परीक्षा सुरक्षेत सुधारणा करणे, प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक होण्यासाठी सरकारला शिफारशी केल्या जाणार आहेत. नागरिक, विद्यार्थी आणि संबंधितांना आपल्या सूचना संबंधित सहा विभागांकडे ई-मेलवर पाठविता येणार आहेत. बैठकीची वेळ आणि सहभागाची प्रक्रिया संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
पेपरफुटी आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्याचे आव्हान सरकारसमोर राहणार आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या या राज्यव्यापी संवादातून नेमक्या कोणत्या सुधारणा सुचवल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.