
Mumbai News : महाराष्ट्रात एसटी बससेवा म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजला जातो. पण याच एसटी महामंडळाच्या विभागातून मोठी अपडेट समोर आल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झालं आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पण आता याचदरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी(ता.20)एसटीमध्ये तब्बल कंत्राटी पद्धतीनं 17,450 चालक व सहाय्यक पदांसाठी मेगाभरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी आगामी काळात परिवहन मंडळाच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या तब्बल 8 हजार नव्या बसेससाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एसटी परिवहन महामंडळाकडून 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला .यासंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यातील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगार तरुण -तरुणींना या एसटी विभागाच्या भरती प्रक्रियेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या नव्यानं एसटी महामंडळाच्या (ST Department) भरती प्रकियेतून निवड झालेल्यांना सुरुवातीलाच 30 हजार रुपये इतके किमान वेतन देखील दिले जाणार आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील होतकरु तरुण-तरुणींनी संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असंही म्हटलं आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात दिवसेंदिवस बससेवेला मिळणारा प्रतिसाद हा वाढताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एसटी प्रवाशांना सुखकर आणि सुरळीत प्रवास करता यावा याचसाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. तीन वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीतच संप पुकारला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.आता जर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्याचा मोठा फटका ग्रामीण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.