Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलमध्ये एसी बंद, अंधार आणि भीतीचा थरार!, 200 प्रवाशांचा जीव टांगणीला

Mumbai Monorail Breakdown Incident : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल बंद झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मोनोरेलचा आधार घेतला. मात्र चेंबूर-भक्तीपार्कदरम्यान हीच मोनोरेल अडकून पडल्याने तब्बल 200 प्रवासी दोन तास हवेत अडकले होते. एसी बंद, लाईट बंद आणि गुदमरल्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला आला होता.
Mumbai Monorail
Mumbai Monorail sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • चेंबूर-भक्तीपार्कदरम्यान मोनोरेल दोन तास हवेत थांबली; शेकडो प्रवासी अडकले.

  • एसी व लाईट बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरला, घबराटीचं वातावरण.

  • अखेर बचावकार्य सुरू होऊन प्रवाशांची सुरक्षित सुटका; मात्र मोनोरेल सुरक्षेवर प्रश्न.

Mumbai News : मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत तर मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबईत अनेक ठिकणी पाणी साठल्याने रेल्वे मार्गही विस्कळीत झाले आहेत. लोकल देखील बंद पडली आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी प्रवासी अडकले आहेत. अशातच चेंबूर–भक्तीपार्कदरम्यान धावणारी मोनोरेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने 200 प्रवाशी हवेतच अडकले. त्यात वृद्ध, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. सुमारे दोन तास ही मोनोरेल हवेत लटकून थांबली आणि एका बाजुला कलंडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या प्रकारामुळे प्रवाशांत घबराहट पसरली असून 'नको रे मोनोरेल बाबा' अशीच प्रतिक्रिया प्रवाशी देताना दिसत आहेत.

वर हवेतच मोनोरेल बंद पडल्याने एसी देखील बंद पडला. यामुळे आत प्रवाशांची गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांची श्वास घेणेसुद्धा कठीण झालं होते. तर लाईट गेल्याने अंधार पसरला होता. यामुळे प्रवाशांची भीती अधिक वाढली होती. त्यामुळे काहींनी दरवाजे फोडण्याचा प्रयत्न केला, काहींनी पोलिस व अग्निशमन दलालाशी संपर्क केला.

Mumbai Monorail
'मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस', Devendra Fadnavis On Mumbai Rains |Rain Update |

दरम्यान घाबरलेल्या काही प्रवाशांनी मोनोरेलच्या काचा फोडल्या आणि हवा खेळती केली. यामुळे गुदमरलेल्या प्रवाशांना थोडा आराम मिळाला. मात्र मदत उशिरा पोहोचल्याने आणि गरज असताना आपत्कालीन क्रमांकही न लागल्याने प्रवाशांतमध्ये संतापाची लाट उसळली होती. तर भीतीही वाढली होती.

अखेर दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर बचावकार्य सुरू झालं. मोनोरेल हळूहळू ओढून नेली गेली आणि प्रवाशांची सुटका झाली. सुटकेनंतर अनेकांनी जीव वाचल्याचा आनंद व्यक्त केला. पण अडलेल्या अचानक या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीही परसली असून एका प्रवाशाने, “लोकल बंद होती म्हणून मोनो पकडली. पण दोन तास अडकलो, श्वास गुदमरला. आता कधीच मोनोरेलने प्रवास करणार नाही असे सांगितले.

राज्याच्या राजधानीत अशा पद्धतीने घडलेल्या या घटनेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि तांत्रिक देखभालीचा मुद्दा देखील गंभीरपणे उपस्थित केला जातोय.

जीवाचं बरं वाईट झालं तर

या घटनेवरून विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोनोरेलमध्येच थांबल्याची माहिती मिळाली असून आता बचाव कार्य सुरु झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात प्रशासन आहे की नाही, सरकार आहे की नाही अशी स्थिती दिसतेय. आतातर मोनोरेलमध्येच अडकली. प्रवासी अडकले, त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

Mumbai Monorail
Mumbai Rain Red Alert : पावसामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू; साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल अन् राजकारणही तापलं

FAQs :

Q1. मोनोरेल नेमकी कुठे अडकली होती?
चेंबूर आणि भक्तीपार्कदरम्यान मोनोरेल दोन तास थांबली होती.

Q2. प्रवाशांना कोणते त्रास झाले?
एसी बंद पडल्यामुळे श्वास गुदमरला, लाईट गेले आणि अंधार पसरल्याने भीती वाढली.

Q3. प्रवाशांची सुटका कशी झाली?
अखेर बचाव पथकाने मोनोरेल ओढून नेली आणि दोन तासांनंतर प्रवाशांची सुरक्षित सुटका झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com