Corporator Disqualification :...तर पक्षाची साथ सोडणारे नगरसेवक ठरणार अपात्र, काय आहे नियम?

Municipal Corporator Disqualification Rules : महापालिका निवडणुकीनंतर पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत घरोबा करणाऱ्या बंडखोर नगरसेवकांवर थेट अपात्रतेची टांगती तलावर असते.
ZP election
ZP election sarkarnama
Published on
Updated on

Municipal Election : महापालिका निवडणुकीनंतर काही नगरसेवक नाॅट रिजेबल असल्याचे तसेच आपल्याच पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेल्याचे समोर आले आहे.त्यामुळे नगरसेवकांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीनंतर एका महिन्याचा आता निवडणूक आलेल्या राजकीय पक्षांच्या किंवा अपक्ष नगरसेवकांना आघाडी किंवा गट म्हणून विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

या नोंदणीनंतर पक्षाच्या प्रमुखाचे आदेश डावलून भूमिका घेणाऱ्या तसेच महापौर निवडणुकीत क्राॅस व्होटींग करणार नगरसेवक थेट अपात्र ठरू शकतो. कारण गटाच्या नोंदणीनंतर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू झालेला असतो. त्यामुळे त्या नगरसेवकाला आपले पद गमावावे लागते.

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिकनियमानुसार सदस्याने एकदा विभागीय आयुक्तांच्या समोर जाऊन सही केली तर त्याला पक्षाचा आदेश डावलता येत नाही.

कशी होती नोंदणी?

विभागीय आयु्क्तांकडे गट आणि आघाडीसाठी पक्षाला दोन प्रकारचे अर्ज दिले जातात. एका अर्जावर सर्व नगरसेवकांची एकत्रित माहिती दिली जाते. तर, दुसऱ्या अर्जात उमेदवाराची वैयक्तिक माहिती असते. त्या अर्जावर विजयी उमेदवाराची स्वाक्षरी असते. या अर्जासोबत उमेदवाराला आपले आधार कार्ड द्यावे लागते. विभागीय आयुक्त उमेदवाराचा फोटो आयडी तपासून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेत त्याची नोंद गॅझेटमध्ये करतात.

ZP election
MP Dhairyashil Patil: खासदाराच्या 'होममिनिस्टर'साठी भाजप-राष्ट्रवादींचे कार्यकर्ते एकवटले! ZP साठी सुधागडमध्ये मोर्चेबांधणी

नगरसेवक अपात्र ठरण्याची कारणे

ज्या चिन्हावर निवडणूक आलोय त्या पक्षाचे, आघाडीचे सदस्यत्व सोडणे

पक्षाचा आदेश डावलून मतदान करणे किंवा टाळणे

लाभाचे पद स्वीकारणे

अपात्रतेसंदर्भात निर्णय जिल्हाधिकारी किंवा आयुक्त देतात.

निर्णय देण्यासाठी त्यांच्याकडे 90 दिवसांची कालमर्यादा असते.

ZP election
Murlidhar Mohol : पुण्यातील 'ते' भाजप नेते नगरसेवक पदापासून दूर राहणार ; मंत्री मुरलीधर मोहोळांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com