devendra fadnavis | ajit pawar.jpg
devendra fadnavis | ajit pawar.jpgsarkarnama

Ajit Pawar : "अजितदादांनी थांबवलं तरी, भाजपच्या आमदाराविरोधात लढणार", 'NCP'तील नेत्या इरेला पेटल्या

Nagpur East Assembly Constituency : पूर्व नागपूरमधून भाजपचे खोपडे हे आमदार आहेत. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेनं आमदार खोपडे यांना आव्हान दिलं आहे.
Published on

पूर्व नागपूर मतदारसंघातून भाजपचे कृष्णा खोपडे हे सलग तीनवेळा विधानसभेला निवडून आले आहेत. आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार ) माजी नगरसेविकानं कृष्णा खोपडे यांच्यासमोर आव्हान उभ केलं आहे. तसेच, अजितदादांनी बोललं, तरी माघार घेणार नाही, असं माजी नगरसेविकानं ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे महायुतीतीलच महिला नेत्यानं आमदार खोपडे यांना आव्हान दिल्यानं अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

आभा पांडे, असं माजी नगरसेविकाचं नाव आहे. "भाजप ( Bjp ) मतदारसंघाचा दावा सोडेल की नाही, माहिती नाही. पण, मी मैदानात उतरणार आहे," असं सांगून आभा पांडे यांनी आमदार खोडपे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच, पूर्व नागपूर मतदारसंघात अनियोजित विकास झाल्याची टीकाही पांडे यांनी केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

आभा पांडे म्हणाल्या, "मी विधानसभेच्या तयारीला सुरवात केली आहे. लोकशाही आणि राजकारणात जनता ही सर्वतोपरी असते. मी मैदानात उतरावं, असा जनतेचा आग्रह आहे."

devendra fadnavis | ajit pawar.jpg
VIDEO : राहुल गांधींबाबत बोंडेंचं वादग्रस्त विधान अन् फडणवीसांचा उल्लेख करत यशोमती ठाकूर पोलिसांवरच भडकल्या

तीन टर्म खोपडे हे पूर्व नागपूरमधून आमदार आहेत. लोकसभेला पूर्व नागपूरमधून नितीन गडकरी यांना सर्वाधिक लीड मिळालं आहे. त्यामुळे भाजप दावा सोडेल का? असा प्रश्न विचारल्यावर आभा पांडे यांनी म्हटलं, "भाजप दावा सोडेल का नाही, हे माहिती नाही. पण, मी मैदानात दिसणार आहे. या मतदासंघातून भाजपला नाही, तर गडकरींच्या व्यक्तीमत्त्वाला पाहून नागरिकांनी मतदान केलं आहे. "

"गडकरींना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 77 हजारांचं लीड मिळालं होतं. मात्र, आमदार खोपडे हे फक्त 23 हजार मतांनी निवडून आले आहेत. गडकरींना मिळालेल्या मतांवरून विधानसभेचं गणित मांडू शकत नाही," असं आभा पांडे यांनी सांगितलं.

devendra fadnavis | ajit pawar.jpg
MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार; किती अंगलट येणार अन् काय कारवाई होणार?

"मागील पंधरा वर्षांपासून आमदार खोडपे हे विकासाच्या बोंबा मारत आहेत. परंतु, तीन तासांच्या पावसामुळे पूर्व नागपूर पाण्यात होते. कुठही पूल बांधण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. अनियोजित विकासामुळे जनता त्रासली आहे," अशी टीका पांडे यांनी आमदार खोपडे यांच्यावर केली.

हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला नाहीतर, काय करणार? हा प्रश्न विचारल्यावर आभा पांडे म्हणाल्या, "अजितदादांनी ( Ajit Pawar ) हा मतादरसंघ राष्ट्रवादीकडे घेतला नाही, तरी सुद्धा मी लढणार आहे. माझी तयारी सहा महिन्यांपासून सुरू आहे. अजितदादांनी माघार घेण्यास सांगितलं, तरी मी माघार घेणार नाही. कारण, माझी तयारी खूप पुढे गेली आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com