MVA News : 'सीएम' पदावरून महाविकास आघाडीत खटक्यावर खटके; जयंत पाटलांनी दिला 'हा' सल्ला

Monsoon Session 2024 News : खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर यावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.
Sanjay Raut, Uddhav Thackray, Jayant Patil
Sanjay Raut, Uddhav Thackray, Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री असणार यावरून महाविकास आघाडीत आतापासूनच चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर यावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत बैठक बोलावून घेऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे विरोधकांना चांगलीच ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. लोकसभेप्रमाणे जर विधानसभा निवडणुकीत यश मिळाले तर महाविकास आघाडीची (MVA) सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून चर्चा रंगली आहे. (MVA News)

विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारी सुरु झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावा. त्याचा फायदा आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला होईल, अशी शक्यता प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सभेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच आघाडीने निवडणुकीत ३० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackray, Jayant Patil
Maharashtra Monsoon Session 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; पाहा खास फोटो!

दुसरीकडे काँग्रेसची (Congress) दिल्लीत बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा आता न करताच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस या तीन पक्षापैकी अधिकच्या जागा कोणत्या पक्षाच्या निवडून येणार त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यात यावी, अशी चर्चा झाली असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य करताना सावध भूमिका घेतली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्याबाबत महाविकास आघाडीची बैठक होईल. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून विधानसभेचा चेहरा कोण असेल, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही 25 तारखेला एकत्र बसणार होतो. पण दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक असल्याने आमची बैठक पुढे ढकलली गेली.

लवकरच त्याबाबत चर्चा होईल. आमची अपेक्षा आहे की, कुठल्याही घटक पक्षाने या विषयी प्रसारमाध्यमांमधून वक्तव्य करु नये”, असं आवाहन करत जयंत पाटील यांनी मविआतील तीन पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut, Uddhav Thackray, Jayant Patil
Uddhav Thackeray : अधिवेशन वादळी होणार! शेवटच्या दिवशी येणारे उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी 15 मिनिटे आधी हजर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com