MVA Seat Sharing Maharashtra : मविआत जागावाटपाचा तिढा वाढला; अमरावतीवर काँग्रेस-ठाकरेंमध्ये ‘मैत्रीपूर्ण'चा खेळ रंगणार?

MVA seat-sharing talks hit a roadblock over Amravati and Chhatrapati Sambhajinagar seats ahead of the October 23 MLC polls : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान; अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांवरून काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटात मतभेद, रविवारी अंतिम बैठकीकडे लक्ष
Nana Patole Uddhav Thackeray
Nana Patole Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra MLC Election 2026 : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढला आहे.

विशेषतः अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी मविआच्या नेत्यांच्या बैठका सुरू असतानाच, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून ‘मैत्रीपूर्ण लढती’चे संकेत मिळू लागल्याने आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी अमरावती आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरची जागा पक्षाला मिळाली नाही, तर ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याचा इशारा दिला आहे. राऊत यांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसदेखील निवडणूक मैत्रीपूर्ण पद्धतीने लढण्याच्या तयारीत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांच्या या भूमिकेमुळे जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेला आता वेगळे वळण मिळाले आहे. मविआतील दोन प्रमुख घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी दाखवल्यास संबंधित मतदारसंघांमध्ये आघाडीतीलच पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Nana Patole Uddhav Thackeray
Shetkari Karjmafi : कर्जमाफीचा दाखला मागायला गेला, संतापला अन् महिला मॅनेजरच्या दिशेने खुर्ची फेकली; तेल्हाऱ्यात नेमकं काय घडलं?

काँग्रेसने अमरावती शिक्षक, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे पक्षानेही अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवर दोन्ही पक्षांचा दावा स्पष्ट झाला आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे या जागेचा निर्णय मविआच्या जागावाटपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Nana Patole Uddhav Thackeray
France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; 560 शाळांबाहेर आंदोलन, 1,900 हून अधिक अटक

23 ऑक्टोबरला मतदान

विधानपरिषदेच्या या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी आहे. त्यामुळे मविआतील जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी पक्षांकडे आता कमी कालावधी उरला आहे.

रविवारी अंतिम बैठकीकडे लक्ष

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. रविवारी जागावाटपाबाबत अंतिम बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांवरील दावा कोणत्या पक्षाच्या बाजूने सुटतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बैठकीत एकमत झाले तर मविआच्या उमेदवारांबाबत चित्र स्पष्ट होईल. मात्र, जागावाटपावर सहमती न झाल्यास संबंधित मतदारसंघांमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पाच जागांची निवडणूक मविआच्या अंतर्गत समन्वयाचीही कसोटी ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com