Shetkari Karjmafi : कर्जमाफीचा दाखला मागायला गेला, संतापला अन् महिला मॅनेजरच्या दिशेने खुर्ची फेकली; तेल्हाऱ्यात नेमकं काय घडलं?

Farmer loan waiver dispute sparks chaos at a rural bank in Telhara, Akola : अकोल्यातील तेल्हारा ग्रामीण बँकेतील प्रकार; महिला व्यवस्थापकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली घटनेची दखल
Shetkari Karjmafi
Shetkari KarjmafiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra loan waiver : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे बँकेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

कर्जमाफीचा दाखला मागण्यासाठी ग्रामीण बँकेत गेलेल्या एका शेतकऱ्याने अपेक्षित उत्तर न मिळाल्याने संतापाच्या भरात महिला बँक व्यवस्थापकाच्या दिशेने खुर्ची फेकल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत बँक मॅनेजरला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील ताथोड नामक शेतकरी (Farmer) कर्जमाफीच्या दाखल्यासाठी बँकेत आला होता. यावेळी त्याने बँकेच्या महिला व्यवस्थापकाकडे कर्जमाफीसंदर्भातील दाखला मागितला. मात्र, संबंधित प्रकरणात अपेक्षित उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्याचा संताप झाला. त्यानंतर कार्यालयातील खुर्ची महिला व्यवस्थापकाच्या दिशेने फेकण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे बँकेत (Bank) काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेत महिला व्यवस्थापकाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे.

Shetkari Karjmafi
France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; 560 शाळांबाहेर आंदोलन, 1,900 हून अधिक अटक

बावनकुळेंकडून घटनेची दखल

या घटनेची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली आहे. नेमका प्रकार कशामुळे घडला, याची माहिती घेत असून त्यामध्ये नेमकी चूक कोणाची होती, हे तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. बावनकुळे म्हणाले की, “बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. फोन करू नका.” पतसंस्थांपासून डीसीसी बँकांपर्यंत तसेच खासगी आणि सरकारी बँकांपर्यंत कोणत्याही संस्थेने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shetkari Karjmafi
Akole Sarpanch : सरपंच दोन वर्षांपासून अनुपस्थित; 8.41 लाखांचा निधी पडून, अकोल्यातील ग्रामस्थ आक्रमक

मॅनेजरला मारण्यापर्यंत परिस्थिती का आली?

या घटनेबाबत बोलताना बावनकुळे यांनी महिला बँक व्यवस्थापकाच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचाही मुद्दा उपस्थित केला. महिला असल्याने तिचा सन्मान राखला पाहिजे. व्यवस्थापकाची काही चूक असल्यास संबंधित शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले. मात्र, मॅनेजरला मारण्यापर्यंत काय परिस्थिती निर्माण झाली, हे चेक करतो, असे सांगत बावनकुळे यांनी घटनेच्या मूळ कारणाची चौकशी करण्याचे संकेत दिले.

शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर घटना चर्चेत

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असतानाच तेल्हारा येथील ही घटना समोर आली आहे. कर्जाच्या समस्येसोबतच दुष्काळ आणि शेतीशी संबंधित आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत अपेक्षा आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा दाखला मिळवण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांची होणारी धावपळ हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com