MVA Sharad Pawar Strategy : उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठीही 'शरद पवार' पॅटर्न ? काँग्रेसवर पुन्हा 'शांत' राहण्याची नामुष्की

Uddhav Thackeray Legislative Council: विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेचा 'शरद पवार' पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे.
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MVA alliance politics : पुढील महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. आठ जागांवर विधान परिषदेची निवडणूक होत नवीन 9 आमदार महाराष्ट्राला मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता या नऊ पैकी केवळ एकच जागा त्यांच्या वाट्याला येणार आहे.

विधान परिषदेमधून उद्धव ठाकरे हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांचा या जागेवर दावा असणार आहे. तर, काँग्रेस देखील ही जागा आपल्याकडे राखण्यास इच्छुक आहे. मात्र,राज्यसभेला शरद पवारांना उमेदवारी देत बंडखोरी थांबण्यात आली. तोच 'शरद पवार' पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता असून उद्धव ठाकरेच उमेदवार असण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी 29 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 20 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 असे आघाडीकडे 46 मतं आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा एका उमेदवार सहज विजयी होईल.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या मनात काय? विधीमंडळात जाणार नाही..., संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

उद्धव ठाकरें पुन्हा आमदार?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधान परिषेदवर विजयी झाले होते. आता राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे विधान परिषदेमधील एक एक आमदार महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा आहे. त्यातच जर ठाकरे आमदार होण्यास इच्छुक नसतील तर काँग्रेस या जागेवर दावा सांगेल. त्यामुळे ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावे, यासाठी त्यांच्या पक्षातून त्यांना विनंती केली जाऊ शकते.

मविआचा 'शरद पवार' पॅटर्न

राज्यसभा निवडणुकीत मविआचा एकच उमेदवार विजयी होईल येवढेच संख्याबळ होते. ठाकरेंची शिवसेना,काँग्रेस या जागेसाठी आग्रही होते. जर ठाकरेंच्या शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा उमेदवार मैदानात असता तर भाजप आणि मित्रपक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण केले असते.

मात्र, शरद पवारांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि मित्र पक्षांनी ती निवडणूक बिनविरोध केली. अगदी तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर भाजप आणि महायुतीमधील मित्रपक्षांकडून त्यांच्या विरोधात उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध केली जाईल.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
MVA Rajya Sabha: 'मविआ'कडून शरद पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी, 'मातोश्री' अन् 'दिल्ली'हून 24 तासांतच सूत्रं फिरली; 4 कारणं ठरली महत्त्वाची?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com