Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या मनात काय? विधीमंडळात जाणार नाही..., संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Sanjay Raut Uddhav Thackeray : विधान परिषदेच्या जागेवर उद्धव ठाकरे निवडणूक लढणार की नाही, याबाबत संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
Sanjay Raut Uddhav Thackeray
Sanjay Raut Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : महाविकास आघाडीमध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी काँग्रेस आग्रही आहे तर विधान परिषदेच्या जागेवर उद्धव ठाकरेंना पुन्हा संधी मिळावी, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. आता,याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पत्रकार परिषदेला आले नाहीत त्यामागे त्यांची अडचण होती. शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत, काही नेते तिकडे गेले होते तर काही नेते मुंबईच्या बाहेर राहण्यासाठी आहेत. आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत.

हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र, त्यांच्या मनात काय आहे याची चाचपणी आम्हाला करावी लागेल. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेबाबात आम्ही तिन्ही पक्ष (शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस) मिळून बैठक घेऊन निर्णय घेऊ

Sanjay Raut Uddhav Thackeray
Eknath Shinde on Maoist surrender : माओवादी देवजीची शरणागती; शिंदेंचा शाहांना सलाम, ‘निर्धाराचं फळ मिळालं!’

सपकाळ नेमके काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, मागील वेळी विधान परिषदेवर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना संधी देण्यात आली होती. आता देखील आमची तिच इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे. तसेच राज्यसभेची जागा ही काँग्रेससाठी सोडण्यात यावी. काँग्रेस उमेदवाराला खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळावी.

Sanjay Raut Uddhav Thackeray
Mira-Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेचा मोठा निर्णय, विकास आराखडा रद्द! समितीची स्थापना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com