MVA march : मतचोरी विरोधात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; मोर्चा किती वाजता निघणार? मार्ग काय असणार? नेत्यांनी सगळेच सांगितले

Rama theft protest Maharashtra News : मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले” अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : निवडणूक आयोगाच्या गैरकारभारा विरोधात व बोगस मतदार उघडकीस आणल्यानंतर आता मत चोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी, मनसेचे नेते एकवटले आहेत. निवडणूक आयोगाचा गैरकारभार चव्हाटयावर आणण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभार, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत शनिवारी 1 नोव्हेंबर सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले” अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.

या मोर्चाच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षाची तयारी सुरु आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर माविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सचिन सावंत उपस्थित होते. मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
BJP News : अख्ख्या पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश; मेगा भरतीने काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरे

“आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील. केवळ राजकीय पक्ष नाही तर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय, आणि ज्या चुकींच्या मतावर सरकारमध्ये बसलंय असं वाटतं ते लोकही मोर्चात सहभागी होतील” असं अनिल परब म्हणाले. “पोलिसांना भेटलो. सूचना घेतल्या. मोर्चाचे रुट प्रसिद्ध केले आहेत. उद्या क्यूआर कोड पाठवू. म्हणजे लोकांची व्यवस्था होईल. मुंबईवरून येणाऱ्या दोन लोकांची वाहन व्यवस्था राहील. मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील” असं अनिल परब म्हणाले.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
BJP News : अख्ख्या पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश; मेगा भरतीने काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरे

“मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे. आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा” असं अनिल परब यांनी सांगितलं. “आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतो. मतदार यादीतील घोळ दूर करा. आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चोक्कलिंगम यांनी जे सांगितलं त्यावरही अभ्यास करत आहोत. आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे” असं अनिल परब म्हणाले.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधींमुळे निवडणूक आयोग वठणीवर; हर्षवर्धन सपकाळांचा दावा

चोर चोऱ्या करणार. आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला.रोहित पवार वगैरे घाबरणारे नाहीत.बिनधास्त नडत आहेत.हा गांधी नेहरूंचा देश आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
NCP Anil Patil Politics: निवडणुकीतील लक्ष्मी दर्शनावर महायुतीने शोधला रामबाण, अमळनेरमध्ये बिनविरोधचे वारे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com