Rahul Gandhi : राहुल गांधींमुळे निवडणूक आयोग वठणीवर; हर्षवर्धन सपकाळांचा दावा

Election Commission News : महाराष्ट्राच्‍या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचाच विश्वास नाही. अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फेरफार झाली. हजारो मतदार पाच महिन्यात वाढले. त्यावर राहूल गांधी शंका व्यक्त केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : ‘गली गली मे चोर है, चुनाव आयोग चोर है‘ हे आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहचवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता वठणीवर आला आहे. पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ लागला आहे. मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या जात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

महाराष्ट्राच्‍या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचाच विश्वास नाही. अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फेरफार झाली. हजारो मतदार पाच महिन्यात वाढले. त्यावर राहूल गांधी (Rahul Gandhi) शंका व्यक्त केली. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने चोरल्याचा आरोप केला होता. मत चोरीचे अनेक पुरावेसुद्धा राहुल गांधी यांनी सादर केले होते. त्यानंतर काँग्रेसने देशभर मतदार याद्यांच्या घोळाच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. त्यामुळे निवडणूक आयोग आता वठणीवर आला आहे.

Rahul Gandhi
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का, महत्वाचा बडा नेता लागला भाजपच्या गळाला

आरक्षणालाही भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता. आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही, असेही सांगण्यात येत होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणना करण्यास राहुल गांधी यांनी बाध्य केले. मतचोरीच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संताप समजण्यासारखा आहे. जो माणून मतचोरीतून मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगावर आरोप होत असताना भाजपचे नेतेच खुलासा करीत सुटले असल्याचा टोलाही सपकाळ यांनी मारला.

Rahul Gandhi
BJP Politics : 'जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटू, भाजपमधील इन्कमिंगवर गडकरींची नाराजी'; बावनकुळे म्हणाले, आम्हाला...

भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे. कोणी तिथेही काळबेर केले असले तरी त्यांच्या मशीनमध्ये टाकल्याच तो शुद्ध व स्वच्छ होतो. भाजपच्या नेत्यांनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र, सत्तेत सोबत घेतल्यानंतर सर्वांना क्लिनचिट दिल्याचे सपकाळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी मतदार याद्या तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

Rahul Gandhi
BJP On Dhangekar: ...अखेर भाजपनं डोईजड झालेल्या धंगेकरांविरोधात पाऊल उचललंच, अडचणीत आणणारा 'तो' जुना घोटाळा बाहेर काढला

पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्यानंतर मतदार याद्यांमध्ये रोज नवनवे घोळ समोर येऊ लागले आहेत. राज ठाकरे यांनी स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या विरोधात भव्य मोर्चाच काढण्याचे जाहीर केले आहे. मतदार याद्याच्या घोळाची देशपातळीवर दखल घेतली जाईल, इतका मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनीसुद्धा मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे. हा घोळ वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. या विरोधात आपण २०१२मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Rahul Gandhi
Shivsena Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंचा दुसरा नेता अडचणीत, विक्रम नागरेंचा माफीनामा पोलिस स्विकारतील का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com