Ramnath Kovind
Ramnath KovindSarkarnama

Ramnath Kovind News : 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेवर माजी राष्ट्रपती करणार सर्व पक्षांशी चर्चा...  

One Nation One Election :आज कोविंद समितीची बैठक, एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत राजकीय पक्षांचे मत जाणून घेणार

New Delhi News : 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या संकल्पनेवर विचारमंथन करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची आज ' बैठक होण्याची शक्यता आहे. या संकल्पनेबाबत आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे मानले जात आहे. या वेळी एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिक्रियांवरही चर्चा केली जाणार आहे.

मात्र, या  'अनौपचारिक' बैठकीसाठी कोणताही लेखी अजेंडा देण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण, यात राजकीय पक्षांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांची चर्चा होऊ शकते. समितीने पहिल्या बैठकीत राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramnath Kovind
Gram Panchayat Strike: राज्यभरातील गाव कारभार ठप्प; ग्रामसेवक, सरपंचाचं तीन दिवस कामबंद आंदोलन

 समितीने नुकतेच पक्षांना पत्र लिहून त्यांचे म्हणणे मागवले होते. तसेच चर्चेसाठी तारीख सुचविण्याचेदेखील आवाहन करण्यात आला होते. ज्या पक्षांनी या पात्राला उत्तर दिले नव्हते, त्यांना नंतर स्मरणपत्र पाठवून त्यांची प्रतिक्रिया मागवण्यात आली होती.

समितीने सहा राष्ट्रीय पक्ष, 33 राज्य पक्ष आणि सात नोंदणीकृत पक्षांना पत्र पाठवून 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर त्यांच्या सूचना मागवल्या आहेत. समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत कायदा आयोगाचे मतही ऐकले आहे. या मुद्द्यावर विधी आयोगाला पुन्हा बोलावले जाऊ शकते.

काय आहे संकल्पना

वन नेशन, वन इलेक्शन या संकल्पनेत केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणे अपेक्षित आहे. यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुकांचा समावेश नाही.

देशात १९६७ पर्यंत ही संकल्पना अस्तित्वात होती. स्वातंत्र्यानंतर १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ अशा सलग चार वेळा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या आहेत. त्यानंतर विधानसभा बरखास्ती व सरकार कार्यकाळ पूर्ण करण्याआधी कोसळल्यामुळं हे गणित बिघडल गेले.

(Edited by- sudesh mitkar )

Ramnath Kovind
Nagpur News: मुख्यमंत्री शिंदेंनी वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण; आपला ताफा थांबवत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com