Devendra Fadnavis : मतदानाची टक्केवारी घसरली; बाहेर निघा, मतदान करा फडणवीसांची हाक !

Nagpur Polling : नागपूर व रामटेकमध्ये दुपार 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी घसरल्याने भाजप नेत्यांना टेन्शन आल्याचे चित्र होते. खुद्द देवेंद्र फडणवीस काही भागात फिरल्याचे चित्र होते.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नागपूर व रामटेक मतदारसंघांत मतदारांनी मतदान करण्यास टाळल्याचे चित्र दुपारी ३ पर्यंत होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचे वृत्त समजताच भाजप नेत्यांनी लगेच बूथ आणि इतर ठिकाणी गाठीभेटी घेत मतदारांना बाहेर काढण्याच्या हालचाली केल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यात दुपारी 3 पर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी न वाढल्याने ही परिस्थिती भाजप नेत्यांवर आली आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी समाधानकारक नाही. पाचही लोकसभा मतदारसंघांत सरासरी 44 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. नागपूर येथे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Baramati Loksabha : 'संभाजी भिडेंनी अजित पवारांना कानमंत्र दिला?', रोहित पवारांनी काकाला सुनावले

नागपूर येथे एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ 38.43 टक्के तर नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागपूर मध्य 35.70 टक्के, नागपूर पूर्व 41.35 टक्के, नागपूर उत्तर 32.02 टक्के, नागपूर दक्षिण 39.81 टक्के, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 42.00 टक्के, नागपूर पश्चिम 39.73 टक्के मतदान झाले आहे.

रामटेक मतदारसंघात 40.10 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्राने उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. या मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्याशी थेट लढत श्यामकुमार बर्वे यांच्याशी आहे. रामटेक मतदारसंघात एकूण 20 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत, तर एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. रामटेक 45.33 टक्के, यात काटोल 41.79 टक्के, सावनेर 42.59 टक्के, हिंगणा 31.30 टक्के, उमरेड 46.08 टक्के, कामठी 38.56 टक्के मतदान झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील काही भागात स्वतः दौरा केला. त्यांनी जयताळा, सोमलवाडा, त्रिमूर्तीनगर, आयटी पार्क, जयप्रकाश नगर, मनीषनगर, छत्रपती नगर येथील बूथवर स्वयंसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांशी भेट घेतली आणि संवाद साधला. ज्यांनी अद्याप मतदान केले नाही, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करत, कृपया बाहेर या आणि चांगल्या भविष्यासाठी मतदान करा, असा आग्रह धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

  • R

Devendra Fadnavis
Parbhani News : परभणीत बंगला बांधणार; माझ्या घरात वाघ, साप, मांजर पाणी पिऊन जाणार.. ; जानकरांचं अनोखं स्वप्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com