

Nagpur News: मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. याच दुबार मतदारांना वापर करून भाजपने विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे. याद्यांमध्ये दुबार मतदार असल्याचे सर्वच मुख्यमंत्री यांनी सुद्धा मान्य केले आहे.
यानंतर निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेईल आणि याद्यांमध्ये सुधारणा केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ कायम असल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील न्यू कैलास नगर या प्रभागातील यादीमध्ये तब्बल १०० मृत मतदारांची नावे आढळून आली आहे.
बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी प्रभाग क्रमांक ३३ मधील न्यू कैलाश नगरातील यादी क्रमांक १२३ ते १२७ मध्ये शंभर मृतकांची नावे असल्या निदर्शनास आणून दिले आहे. एवढेच नव्हे तर याच प्रभागातील १२३ ते १२६ क्रमांकाच्या याद्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुद्धा दर्शविण्यात आलेल्या आहेत. शेवडे यांनी मृतक मतदारांची नावेच काढली असून ती निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
हे बघता निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये सुधारणा केली नसल्याचे स्पष्ट होते. निवडणुकी याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तीन डिसेंबरची तारीख देण्यात आली आहे. मात्र रोज नवनवे घोळ समोर येणारे घोळ बघता महापालिकेची निवडणुकीत मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते व मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सुद्धा त्यांच्या मतदार याद्यांमधील घोळा समोर आणला आहे. त्यांच्या प्रभागात बाहेरच्या प्रभागातील मतदारांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेच्या निवडणूक विभागात मतदार याद्यांमधील घोळाच्या रोज तक्रारी येत आहे. त्यात सुधारणा केली जात आहे. मात्र सुधारणेची टक्केवारी दोन टक्क्यांच्या आसपास आहे. आता सुधारणेसाठी एकच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अनेकांनी मतदार याद्यांमधील आपली नावे शोधलेलीच नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी घोळाचे आणखी नवे प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.