Manoj Jarange On Nagpur Riots : कबर इथं दंगल नागपूरला? हे सगळं फडणवीस पुरस्कृत! मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

Manoj Jarange Patil accuses the government and Devendra Fadnavis of sponsoring the Nagpur riots. Read the full story and allegations here. : हे सगळे कावे आहेत, कबर इथं दंगल नागपूरला? यांचेच सरकार असून हेच कबरीसाठी पैसे देतात, मग कबरही तुम्हीच काढा ना.
Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil News
Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून फेका, नाही तर कारसेवा करू असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर काल नागपूरात झालेल्या आंदोलनानंतर गालबोट लागले आणि दंगल उसळली. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर गंभीर आरोप केला. नागपूरची दंगल ही फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कबर इंथ, मग दंगल नागपूरला कशी झाली? मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर दिसत नाहीत का? असा सवालही (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी केला. वेरूळमध्ये मालोजी राजांची गढी आहे, तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले. निवडणुका आल्या की असे धार्मिक वाद उकरून काढले जातात. त्यामुळे समाजाने सावध राहावे.

हे सगळे कावे आहेत, कबर इथं दंगल नागपूरला? यांचेच सरकार असून हेच कबरीसाठी पैसे देतात, मग कबरही तुम्हीच काढा ना, असा टोला जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला. इथल्या मुसलमानांना औरंगजेबाच्या कबरीबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. नागपूरमध्ये झालेली दंगल ही पूर्णपणे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुरस्कृत आहे. यांना तो कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? तिथं हिंदुत्व जाग होत का नाही? असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil News
Nagpur Violence : नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू; पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात

कबर काढायची तर काढा, फक्त गोरगरीबांना झुंजवू नका, असे आवाहन करतानाच निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद करतात, बरं रक्षण ही तुम्हीच करता. ते मूर्ख तर तुम्ही ही मूर्ख का? इथं माझ्या मताला काय किंमत? सरकारचे लोक म्हणतात कबर हटाव. मात्र यामुळे गोरगरिबांना हे अडचणीत आणतात, अशी टीका जरांगे यांनी केली.

Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil News
Devendra Fadnavis On Chh. Shivaji Maharaj : इथे फक्त छत्रपती शिवरायांचे 'महिमामंडन' होणार, औरंगजेबाचे उदात्तीकरण नाही! फडणवीसांनी ठणकावले...

किंबहुना मुस्लिम जनतेला माझं आवाहन आहे कि कबरीवर प्रेम करू नका. सरकार तुमचे आहे कबर काढायची तर काढू शकता फक्त, गोरगरिबांना जुंझवू नका, याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला. या सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. दिलेलं आश्वासन ते पूर्ण करत नाही. तेलंगणा सरकारने 42 टक्के ओबीसी आरक्षण दिले पण महाराष्ट्रात हे करणार नाही. फडणवीस असे करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याची काम करावे, दंगली नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com