Devendra Fadnavis On Chh. Shivaji Maharaj : इथे फक्त छत्रपती शिवरायांचे 'महिमामंडन' होणार, औरंगजेबाचे उदात्तीकरण नाही! फडणवीसांनी ठणकावले...

Maharashtra's tribute to Chhatrapati Shivaji Maharaj and Devendra Fadnavis's firm stance on not glorifying Aurangzeb. : छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. शेतकरी, बलुतेदार यांना सोबत घेऊन त्याच्यात स्वराज्य निर्माणाची जिद्द निर्माण केली. आपल्याला देव, देश, धर्मकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केलं.
Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj News
Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलेच ठणकावले. 'इथे फक्त शिवाजी महाराजांचेच महिमा मंडन होईल, औरंगजेबाचे उदात्तीकरण नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आले.

यावेळी राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादंगावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर का? तर आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करु शकतो, याचे एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचं दर्शन करु शकतो, असे सांगत इथे फक्त शिवाजी महाराजांचेच महिमा मंडन होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj News
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज नसते तर माझे नाव कलीमुद्दीन असते..! भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

हे केवळ हे मंदिर नाही, तर ही सुदंर तटबंदी आहे. अतिशय चांगला बुरूज, दर्शनी प्रवेशाचा मार्ग इथे आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग या ठिकाणी पहायला मिळतात. ज्या काळात या देशातील राजे, रजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकियांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले, असे (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj News
Devendra Fadnavis News : 'बोक्या असो किंवा खोक्या कुणालाच सोडणार नाही', फडणवीसांचा इशारा

छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. शेतकरी, बलुतेदार यांना सोबत घेऊन त्याच्यात स्वराज्य निर्माणाची जिद्द निर्माण केली. आपल्याला देव, देश, धर्मकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायच नाहीय, देव, देश धर्माकरता लढायचं आहे. हे मावळे असे लढले की, खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पस्त करायचे. हे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे देवेद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj News
Aurangzeb Tomb : 'आम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची आहे. पण,...' फडणवीसांचे संकेत अन् काँग्रेसवर गंभीर आरोप

इथे महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही, याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने पन्नास वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती?. त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होते.

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj News
Sanjay Shirsat On Aurangzeb News : औरंगजेबाच्या कबरीवर यापुढे सरकारकडून एक रुपयाही खर्च होता कामा नये! ती उखडूनच टाकली पाहिजे..

प्रभू श्रीराम युगपूरष..

पण ते युगपुरष होते, त्यांना माहित होते की, जोपर्यंत असुरी शक्तींना संपवण्यासाठी मी समाजाला जागृत करणार नाही, समाजातील कमजोर व्यक्तीच्या मनात शक्ती निर्माण करणार नाही. रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण झाला पाहिजे. म्हणून प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तीला एकत्र केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा निपात केला. म्हणून प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com