Nagpur Winter Session : अनिल देशमुख यांनी डिवचल्यानंतर बच्चू कडूंचा प्रहार

Political News : माजी मंत्री अनिल देशमुख हे विधिमंडळ सभागृहातून पायऱ्या उतरत असताना त्यांचा सामना बच्चू कडू यांच्याशी झाला.
Anil Desshmukh , Bacchu Kadu
Anil Desshmukh , Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. विधिमंडळ परिसरात माजी मंत्री अनिल देशमुख व आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये 'तू तू मै मै' खडाजंगी आणि गंमती जमती घडतच होत्या.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात बोलाचाली झाली. त्याचे झाले असे की, माजी मंत्री अनिल देशमुख हे विधिमंडळ सभागृहातून पायऱ्या उतरत असताना त्यांचा सामना बच्चू कडू यांच्याशी झाला. राज्य मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार आणि हुकलेली संधी यामुळे आधीच वैतागलेल्या बच्चू कडू यांना अनिल देशमुख यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला.

Anil Desshmukh , Bacchu Kadu
Ambadas Danve : "दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत पटेलांचे व्यवहार; आता फडणवीसांची भूमिका काय?"

विधिमंडळाच्या सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. त्यासाठी प्रश्न-उत्तराचा तास स्थगित करावा परंतु अवकाळी, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी चर्चा घ्या, अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण यांनीही केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar ) यांनी दुपारच्या सत्रानंतर चर्चा करूनच वेळ ठरवली जाईल, असे स्पष्ट केले. अनिल देशमुख यांनी हाच विषय छेडत माध्यमांना बाईट देणाऱ्या बच्चू कडूंना तुम्ही सभागृहाबाहेर काय करताय ? आत का नाही बसलात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात बोलू देत नाहीत म्हणजे काय? असा चिमटा काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर कटाक्ष टाकत बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी जणूकाही देशमुख यांवर प्रहारच केला. बच्चू कडू म्हणाले, तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्हाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही. यावर देशमुख शांत झाले. हो का ? असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंशी अधिकचा वाद टाळत आपला मार्ग बदलला.

(Edited by Sachin Waghmare)

Anil Desshmukh , Bacchu Kadu
Bacchu Kadu on Lathi Charge : एकदाचं होऊनच जाऊ द्या दूध का दूध...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com