Amravati Political News : मराठा आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जर ही मागणी करीत असतील तर ती योग्यच आहे. एकदाचं होऊनच जाऊ द्या ‘दूध का दूध और पानी का पानी..’ अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
अमरावती येथे मंगळवारी (ता. २१) आमदार कडु यांनी वडेट्टीवार यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, चौकशीतून सत्य पुढं येणार असेल तर ती नक्कीच झाली पाहिजे. (MLA Bacchu Kadu From Amravati Also Demands Enquiry On Lathi Charge By Police On Maratha Reservation Protesters At Antarwali Sarati)
अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जची चौकशी होणं खरंच गरजेचं आहे. चौकशी झाली की जे लोक बोंबा ठोकत आहेत ते गप्प होतील. त्यांची तोंडं बंद होतील. खरं तर राज्यात सध्या हा तमाशा पाहणारे शोधले पाहिजेत. कोणी हा तमाशा उभा केला, कसा केला, राजकारणासाठी असं कोणी करत असेल तर त्याचा शोध लागला पाहिजे, असं आमदार बच्चू कडू यांनी ठामपणे नमूद केलं.
आधी धर्माच्या नावावर संघर्ष सुरू होता. नंतर तो जातींचा संघर्ष झाला. आता तर पोटजातींची लढाई सुरू झाली. आता आडनावावरून संघर्ष सुरू होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कित्येक वर्षांपासून धर्म, जात, झेंडा, महापुरुष, आडनाव यावरून वाद सुरू आहेत. त्याचा फायदा काही लोक घेत आहेत. आपली राजकीय पोळी ते शेकण्यासाठी अशा प्रकारांचा वापर करतात आणि सामान्य त्याला बळी पडतात असं आमदार कडू यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबात सरकार काय करीत आहे, याचा प्रगती अहवाल सरकारनं देत राहणं गरजेचे आहे. सरकारने यासंदर्भात गंभीरता दाखविली नाही, तर आपण आंदोलनात उतरणार असल्याचं आधीच जाहीर केल्याचं कडू यांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशात सर्व काही चाललंय मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न काही केल्या सुटत नाहीत. स्वातंत्र्याला आता 75 वर्षे झालीत. त्यात काँग्रेस आली, भाजप आली. काँग्रेसने अर्धशतक राज्य केलं, पण काँग्रेसने काय केलं? भारतात 75 वर्षांत ज्यांनी रेटून खाल्लं त्यांना सगळं भेटलं. शेतकरी आजही गरीबच आहे. त्याची खंत वाटते. सरकार कोणाचेही असो शेतकरी, शेजमजूर नेहमीच उपेक्षित राहिला आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.