Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारत अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nana Patekar
Veteran actor Nana Patekar, known for his powerful performances in Marathi and Hindi cinema, has passed away at the age of 75.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nana Patekar Passes Away : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गोव्यातील डोना पावलामधील घरी असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारत अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाम फाऊंडेशनचा आधार हरपला

नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यामातून सामाजिक कार्य हाती घेतलं होतं. 2015 मध्ये नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशची सुरूवात केली. फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत केली जात असे. तसंच दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाची कामे देखील ही संस्था करत असे. नानांच्या निधनामुळे नाम फाऊंडेशनचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com