Nana Patole : "आज जरी हारलो तरी.." निकालानंतर पटोले यांचा खणखणीत दावा!

Assembly Elections Results 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही
Nana Patole On Candidature :
Nana Patole On Candidature :Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News :देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत असून, त्यातील ३ राज्यांत भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होत आहे. या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना" आम्ही आज जरी हारलो असलो तरी लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकून येणार," असा विश्वास व्यक्त केला आहे.

पटोले म्हणाले, या चार राज्यांतील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यांत भरपूर मेहनत घेतली होती, पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole On Candidature :
Telangana Election Results 2023 : केसीआर यांच्या धावत्या कारला ब्रेक...

या राज्यात लोकसभेला वेगळे चित्र

या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील चित्र वेगळे असले तरी ते चित्र लोकसभेला राहणार नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही विजयी झाला होता व भाजपचा मात्र पराभव झाला होता ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल व काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

दक्षिणेमध्ये दारे बंद

हिंदू-मुस्लिम या दोन धर्मात भांडणे लावून ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे, काही राज्यांमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र, त्याच्यासाठी दक्षिणेमध्ये दारे बंद झाली आहेत. जनतेच्या विकासाच्या प्रश्नाबाबत भाजप नेहमी दूर पळतंय हे चित्र आपण पाहतोय. आम्ही आज हरलो असू, पण उद्या जनता जनार्धन काँग्रेसला देशाच्या सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही. देशपातळीवर तसं वातावरण आज निर्माण झालेलं आहे,”असा दावा नाना पटोले यांनी केला.

Nana Patole On Candidature :
Madhya Pradesh Assembly Results: शिवराज यांच्यासोबत 'हे'आहेत मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार...

महाराष्ट्रात भाजपचा विभाजनवाद चालणार नाही

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाचे राज्य आहे. महाराष्ट्रात भाजपचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून, आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

Nana Patole On Candidature :
Assembly Elections Results : देशाचे दक्षिणायन भाजपसाठी दूरच ... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com