Nana Patole : लोकसभेच्या दणदणीत यशानंतर नाना पटोले पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, माजी आमदाराचं निलंबन

Narayanrao Munde suspended from Congress : नारायणराव मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पाठींबा देत मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना जाहीर पाठींबा देणारे काँग्रेसचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत नारायणराव मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जाहीर पाठींबा देत शरद पवारांवर जहरी टीका केली होती. तसेच अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

अंतरवली सराटीमध्ये होणाऱ्या आंदोलनामागे शरद पवार Sharad Pawar असल्याचा आरोप देखील नारायणराव मुंडे यांनी केला होता. उघडपणे त्यांनी पंकजा मुंडे यांना पाठींबा देत मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Nana Patole
Bhagwat Karad : 2 वर्ष 11 महिन्यानंतर डाॅ.भागवत कराडांना अर्थ मंत्रालयाचा निरोप

नारायणराव मुंडे हे विधानपरिषदेचे माजी आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना त्यांनी बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठींबा दिला. पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती.

Nana Patole
Sunil Tatkare : 'अजित पवारांबरोबर जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावली', सुनिल तटकरेंनी दिलं चोख उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com