Video Narayan Rane News : स्ट्राइक रेट सांगणाऱ्या शिरसाटांची नारायण राणेंनी केली कानउघडणी; म्हणाले,...

Mahayuti Political News : लोकसभा निवडणुकीत स्ट्राइक रेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केला होता. त्यामुळे माजी मंत्री नारायण राणे यांनी शिरसाट यांची कानउघाडणी केली.
Sanjay Shirsat, Narayan Rane
Sanjay Shirsat, Narayan Rane Sarkarnama

Political News : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्षात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा भाऊ कोण यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

मीच मोठा असा दावा सर्वच पक्षांकडून केला जात आहेत. त्यातच आता छोटा भाऊ व मोठा भाऊ यावरून आता महायुतीमधील घटक पक्षांत चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीत स्ट्राइकरेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केला होता. त्यामुळे माजी मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिरसाट यांची कानउघाडणी केली.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता राणे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

संजय शिरसाट (Sanjay shirsat) कोण आहेत? आमदार आहेत. अच्छा… अच्छा. कोण वैयक्तिक काय बोलले त्याला काही अर्थ नसतो. महायुती असल्याने सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. येथे कोणी तराजू घेऊन बसलं नाही, मोठं कोण आणि लहान कोण करायला. मोठं कोण आहे? ते कशावर ठरवावं हे आधी ठरवा, असा टोला नारायण राणे यांनी लगावत शिरसाट यांची कानउघडणी केली.

Sanjay Shirsat, Narayan Rane
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

राज्यात निवडणुकीनंतर आमचीच सत्ता येणार, असा दावा महाविकास आघाडीने (MVA) केला आहे. त्यावर बोलताना राणे म्हणाले, आम्ही राज्यात आहोत आणि राहणार आहोत. केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले. त्यासोबतच महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे दावा करून काही फरक पडत नाही. येत्या काळात आम्ही कोकणात कुणाला शिरू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात उद्योगधंदे आण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षात जिल्ह्यात उद्योगधंदे येतील. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोषक वातावरण करणार आहे. हॉटेल व्यवसाय वाढावा, आलेल्या पर्यटकांना इथे आनंदाने दिवस घालवण्यासाठी मनोरंजनाची साधनं निर्माण करण्यावर माझा भर असणार आहे. शिवाय स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Shirsat, Narayan Rane
Ajit Pawar Politics : महायुतीचा उमेदवार कोण? दराडे की भावसार? गोंधळ वाढला!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com