Ajit Pawar Politics : महायुतीचा उमेदवार कोण? दराडे की भावसार? गोंधळ वाढला!

Teachers constituency 2024 : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. असे असतानाच महायुतीचा उमेदवार कोण? यावरून गोंधळ कायम आहे. आमदार किशोर दराडे यांच्या बरोबरच महेंद्र भावसार हे देखील मैदानात आहेत.
Ajit Pawar kishor darade eknath shinde
Ajit Pawar kishor darade eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. असे असतानाच महायुतीचा उमेदवार कोण? यावरून गोंधळ वाढला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे देखील मैदानात आहेत.

दोन्ही उमेदवार महायुतीत मित्रपक्ष असल्याने नेमका उमेदवार कोण, असा संभ्रम आहे. यावर तोडगा निघणार का? अशी चर्चा आहे. दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहिल्यास त्याचा फटका कोणाला बसेल, हे निवडणुकीनंतरच कळेल.

नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारीवरून मतदारांचा गोंधळ उडाला आहे. शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी आपण अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. त्यांचा प्रचारही सुरू आहे. आज या संदर्भात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे झाली. पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध आमदार उपस्थित होते. प्रचाराचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Ajit Pawar kishor darade eknath shinde
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंचा आरोपांचा 'अग्निबाण'; 'सरकारी पाहुण्यांनी आता 'त्यांच्या' गुन्ह्यांची...'

यानंतर धुळे येथील अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अधिकृत उमेदवार महेंद्र भावसार यांनी आपण पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत. महायुतीचे उमेदवारी आपल्यालाच मिळालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अन्य कोणत्याही सूचना नसल्याने आपल्या प्रचार जोरात असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar kishor darade eknath shinde
Rajendra Vikhe : राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत; 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...'

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या बैठकीत अजित पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नसल्याचा दावा उमेदवार भावसार यांनी केला. त्यामुळे आता निवडणूक ऐन रंगात आली असताना महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याने मतदारांचा देखील गोंधळ होणार आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार आणि मतदानावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com