Political News : छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची निर्मिती करुन त्यांनी दूरदृष्टी दाखवून दिली होती. आजही आपला देश त्यांच्याच विचारांवर चालत आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठं काम उभं केल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारतीय नौदलाकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर त्यांनी आर्ट गॅलरीची देखील पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.
हा क्षण महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने मोठ्या भाग्याचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदलाची स्थापना करण्यात आली होती. सिंधदुर्गातील हा ऐतिहासिक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. हा क्षण आमच्या दृष्टीने मोठा अभिमानाचा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने (Bjp) घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचे अभिनंदन करतो. तीन राज्यांत त्यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवता आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील मंत्र्यांसह नौदलाचे अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी नौसेना दलाच्या वतीने पाणबुड्या, विमान प्रात्यक्षिके पार पडली.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.