Narayan Rane : राहुल गांधींच्या निळ्या रंगाच्या कपड्यावरून नारायण राणेंनी सुनावले, 'आंबेडकरवादी...'

Narayan Rane Taunt Rahul Gandhi Congress : नारायण राणे यांनी नितेश राणे हे मंत्री झाल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला ते म्हणाले, वडील खासदार दोन मुलं आमदार त्यापैकी एक मंत्री देशात असं समीकरण असं कुठेच नसेल.
Narayan Rane Rahul Gandh
Narayan Rane Rahul Gandhsarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane News : संसदेमध्ये अमित शाह यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसदेबाहेर काँग्रेसने आंदोलन केले. निळा रंग हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांशी जोडला जातो. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करत संसदेच्या बाहेर आंदोलन केले.

संविधानच्या अवमाना विरोधात परभणीत आंदोलन करणाऱ्या दलित युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज (समोवार) परभणी येत सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी देखील राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचे टीशर्ट परिधान केले होते. या निळ्या रंगाच्या कपड्यांवरून भाजपचे राज्यसभा खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

Narayan Rane Rahul Gandh
Ministry Bungalow : बावनकुळेंना 'रामटेक' तर पंकजा मुंडेंना 'पर्णकुटी'; कोणाला मिळाला ? कुठला बंगला पहा यादी...

'राहुल गांधीला महाराष्ट्र कुठं कळलाय. परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं कपड्याचा रंग फक्त निळा असाल म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं.', असे राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी नितेश राणे हे मंत्री झाल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला ते म्हणाले, वडील खासदार दोन मुलं आमदार त्यापैकी एक मंत्री देशात असं समीकरण असं कुठेच नसेल. त्यामुळे आपण खुश आणि समाधानी आहे.

सोमनाथ हत्या दलित असल्यामुळेच

राहुल गांधी यांनी परभणीला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, त्यांची (सोमनाथ) हत्या दलित असल्यामुळेच करण्यात आली. पोलिसांनी ही हत्या केली आहे. विधानसभेत खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देखील याला जबाबदार आहेत.

Narayan Rane Rahul Gandh
Pilabhit Encounter : तब्बल 700 किलोमीटर पेक्षाही अधिकचा पाठलाग; दोन राज्याचे पोलीस अन् 'एन्काउंटर'चा थरार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com