Praful Patel : भाईजी...भाईजी है ! अजितदादांचा दिल्लीतील 'चॉईस' ठरला! केंद्रीय मंत्रिपदासाठी नाव निश्चित

Narendra Modi Oath Ceremony Praful Patel : सुनील तटकरे हे अजित पवारांचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे तटकरे यांचे नाव देखील मंत्रि‍पदासाठी चर्चेत होते.
Narendra Modi
Narendra Modi sarkarnama

Praful Patel News : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अजितदादांचा चॉईस' कोण असणार हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांचेच नाव निश्चित करण्यात आले आहे. ते उद्या (रविवारी) कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

सुनील तटकरे हे अजित पवारांचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे तटकरे यांचे नाव देखील मंत्रि‍पदासाठी चर्चेत होते. अजितदादांना एक मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याच्या चर्चा होत्या. मात्र, सध्यातरी प्रफुल पटेल Praful Patel हे मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

रविवारी (ता.9) नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदींच्या सोबत एनडीएमधील काही नेते देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांची नावे आज निश्चित केली जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्ली बैठक पार पडली होती. या बैठकीत मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आली होती.

Narendra Modi
Yogendra Yadav : 'या' नेत्याच्या नेतृत्वाखाली 'मविआ'ला विधानसभेला बहुमत मिळेल; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

दरम्यान, आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सागर बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.फडणवीस आणि तटकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. दिल्लीत राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुनील तटकरे दिल्लीसाठी रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com