Narhari Zirwal Video : 'नाॅट रिचेबल' असलेले मंत्री झिरवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटणार; राजीनामा की जीवनदान? आजच होणार फैसला!

Narhari Zirwal Sunetra Pawar : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर झिरवळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Narhari Zirwal Sunetra Pawar :
Narhari Zirwal Sunetra Pawar :sarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात लाच घेताना लिपीकाला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर झिरवळ हे आज उपमुख्यमंत्री नरहरी झिरवळ यांना भेटणार आहेत.

लिपीक राजेंद्र ढेरिंगे याने लाच ही झिरवळ यांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून घेतल्याचे तपासात कबुल केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत.

लिपीकाला अटक झाल्यानंतर झिरवळ हे माध्यमांच्या समोर आले होते. त्यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच याच्याशी काही संबंध आढळला तर आपण राजीनामा देऊ असे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते नाॅट रिचेबल होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

Narhari Zirwal Sunetra Pawar :
Bhiwandi Politics : भिवंडीत शिंदेंना साथ देण्याची भूमिका घेताच कोणार्क विकास आघाडीच्या नेत्याला अटक, महापौर कोणाचा भाजप की शिवसेना?

झिरवळ यांच्या दालनात लाच घेताना लिपीक राजेंद्र ढेरिंगे याला अटक केल्याने सरकारची नेमकी भूमिका काय असणार याची चर्चा देखील सुरू केली आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नरहरी झिरवळ यांची बाजु ऐकूण घेतील. तसेच कोर कमिटीमध्ये झिरवळ यांना अभय द्यायचे की राजीनामा घ्यायचा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राजेंद्र ढेरिंगेच्या घराची झडती

राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिकरोडवरील घराची झडती घेण्यात आली आहे. त्यामध्ये एसीबीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ढेरिंगे हा मुळ अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. मात्र, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. दरम्यान, जप्त कागदपत्रांमुळे त्याच्या अडचणीत वाढ होणार असून ती कागदपत्रे कोर्टात साजर केली जाण्याची शक्यता आहे.

Narhari Zirwal Sunetra Pawar :
BJP Congress Controversy 2026 : राजकारणात खालची पातळी? ‘जीभ छाटा, 10 लाख देतो’; भाजप शहराध्यक्षांच्या घोषणेनं खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com