Bhiwandi Politics : भिवंडीत शिंदेंना साथ देण्याची भूमिका घेताच कोणार्क विकास आघाडीच्या नेत्याला अटक, महापौर कोणाचा भाजप की शिवसेना?

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडीत भाजपला 22 जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन आपला महापौर बसवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असतानाच माजी महापौर तथा कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Bhiwandi Municipal Corporation building ahead of the crucial Mayor election as BJP and Shiv Sena compete to form government in the civic body
Bhiwandi Municipal Corporation building ahead of the crucial Mayor election as BJP and Shiv Sena compete to form government in the civic bodySarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News, 16 Feb : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने पालिकेत कोण सत्ता स्थापन करणार आणि कुणत्या पक्षाचे महापौर उपमहापौर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशातच महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीत लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेने निकालानंतर महापौर आणि उपमहापौर पदावर दावा केल्यामुळे युतीत धुसफूस सुरू झाल्याचं पाहायाला मिळत आहे.

भिवंडीत भाजपला 22 जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन आपला महापौर बसवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असतानाच माजी महापौर तथा कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

त्यामुळे शिवसेनेचं गणित फिस्कटल्याची चर्चा सुरू होती. मात्र, विलास पाटलांच्या अटकेनंतरही शिवसेना महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यानुसारच भिवंडीत महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेना निवडणुका लढवत असून पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे.

Bhiwandi Municipal Corporation building ahead of the crucial Mayor election as BJP and Shiv Sena compete to form government in the civic body
Shivsena UBT : 'मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच; महापौर रितू तावडे साक्षीदार, आपल्या फायद्यासाठी त्याची कबर...' ठाकरेंचा घणाघात

शिवाय या विषयावर तोडगा न निघाल्यामुळे भाजप आणि आम्ही आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. पण अशातच विलास पाटील शिवसेनेसोबत आले असतानाच त्यांना अटक झाली आहे. मात्र, तरीही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून एकनाथ शिंदे सांगतील तो उमेदवार दिला जाणार असल्याचं पक्षनेते प्रकाश पाटील यांनी सांगितलं.

त्यामुळे आता विलास पाटील यांच्या अटकेनंतर भिंवडीत नेमकं कोणाचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. शिवाय विलास पाटील हे सोमवारी पोलीस बंदोबस्तात महापौरपदाचा अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Bhiwandi Municipal Corporation building ahead of the crucial Mayor election as BJP and Shiv Sena compete to form government in the civic body
BJP Congress Controversy 2026 : राजकारणात खालची पातळी? ‘जीभ छाटा, 10 लाख देतो’; भाजप शहराध्यक्षांच्या घोषणेनं खळबळ

दरम्यान, पाटील यांनी अर्ज भरलाच तर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणं नेमकी कशी असणार हे 20 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. भिवंडी पालिकेत सध्या भाजपचे 22 शिंदेंच्या शिवसेनेचे 12 सदस्य निवडून आलेत. इथे बहुमताचा आकडा 46 असून कोणार्क विकास आघाडीचे चार नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे विलास पाटील यांच्या पक्षाची मते सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेसचे 30 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक विजयी झालेत. तसंच समाजवादी पक्ष 6 तर अपक्ष 1 उमेदवार या महापालिकेत विजयी झाला आहे. कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत नसल्याने इथे सत्तास्थापनेसाठी मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com