Narsing Udgirkar : चर्चा तर होणारच..! 'वंचित'च्या पराभूत उमेदवाराने बुक केल्या तब्बल 4 कोटींच्या आलिशान गाड्या

Narsing Udgirkar Purchase Toyota Fortuner Range Rover : लातूर लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 42 हजार मतं होती.
Narsing Udgirkar
Narsing Udgirkarsarkarnama
Published on
Updated on

Narsing Udgirkar News : लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून पराभूत झालेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी एकाच दिवशी चार कोटींच्या दोन गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर गाडी खरेदीची पोस्ट नरसिंग उदगिर यांच्या मुलाने केली होती.

आम्ही वडिलांना गिफ्ट देण्यासाठी गाडी खरेदी केल्याचे स्पष्टकरण नरसिंग उदगीरकर यांचे पुत्र योगेश उदगीरकर यांनी दिले आहे. ते म्हणाले यात काही चूक आहे. अशा प्रकारे सगळे रंगवले जात आहे जे खूप चुकीचे आहे. वडिलांसाठी मुलांनी काही घेतलं तर याच्यात कोणाला का आक्षेप असावा ?

लातूर लोकसभा निवडणुकीत वंचितचे VBA उमेदवार नरसिंग उदगीरकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 42 हजार मतं होती. या मतदारसंघात प्रमुख लढत ही भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे उमेदवार डाॅ.शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये झाली. काळगे हे 62 हजार मतांनी विजयी झाले.

Narsing Udgirkar
Chhagan Bhujbal : शरद पवारांच्या 'या' रणनीतीने छगन भुजबळांची झाली कोंडी?

गाडीच्या उलटसुलट चर्चा

उदगिरी यांच्या गाडी खरेदीच्या सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला चार जुनला आणि निकलानंतर मोजून नवव्या दिवशी उमेदवाराने हायक्लास एकच नाही तर दोन फोरव्हीलर घेतल्या, याला काय म्हणाचे, असे फेसबूकवर एका युजरने म्हटले आहे. तर, एकाने दीड कोटी पेक्षा कमी संपत्ती उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. तसेच वार्षिक उत्पन्न देखील दाखवले होते मग कोट्यावधीची गाडी कशी खरेदी केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हिडिओद्वारे उत्तर

योगेश उदगीरकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना व्हिडिओद्वारे उत्तर दिले आहे. वडिल निवडणुकीला Election उभे होते तेव्हाच आम्ही कुटुंबाकडून त्यांना गिफ्ट देण्याचे नियोजन केले होते. ते विजयी होवू किवा पराभूत पण त्यांना गिफ्ट द्यायचे असे आम्ही ठरवले होते. वडिलांना गाडी गिफ्ट देण हे चुकीचे आहे का? कशावरून एखाद्याला बदनाम करायचं याची पण एक सीमा असायला हवी. कष्ट करून चांगले राहणे वागणे योग्य नाही का ? मला विश्वास आहे की माझ्या जवळचे लोक मला ओळखतात. माझ्या भागातील उदगीर जळकोट मधील माझे सहकारी माझ्या मागे खंबीर पणे उभे राहतील असे योगेश यांनी म्हटले आहे.

Narsing Udgirkar
Chhagan Bhujbal : शरद पवारांच्या 'या' रणनीतीने छगन भुजबळांची झाली कोंडी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com