Chhagan Bhujbal : शरद पवारांच्या 'या' रणनीतीने छगन भुजबळांची झाली कोंडी?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आमदार अस्वस्थ झाले आहेत.
chhagan bhujbal | sharad pawar
chhagan bhujbal | sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भाजपकडून कोंडी केली जात आहे. आता या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतही असेच डावपेच आखण्यात आल्याचे कळते. यामुळे भुजबळ यांची राजकीय कोंडी होऊ शकते.

लोकसभेच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ( Ajit Pawar ) गटामध्ये आमदार अस्वस्थ झाले आहेत.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) सध्या अस्वस्थ आहेत. त्यांनी अन्य पक्षांचे दारे ठोठावून पाहिली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटात भुजबळ यांचा प्रवेश होणार अशी चर्चा होती. मात्र, या प्रवेशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोटातून मोठा विरोध निर्माण करण्यात आला आहे.

सध्या महाविकास आघाडीत शरद पवार प्रमुख नेते आहेत. बहुतांशी निर्णय त्यांच्या कलाने घेतले जातात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भुजबळ यांनी प्रवेशासाठी चाचपणी केल्याचे कळते. मात्र, भुजबळ यांना प्रवेश दिल्यास आघाडीसंदर्भात फेरविचार करण्याचे संकेत पवार यांच्या निकटवर्तीयांनी दिले आहेत, असे कळते. त्यामुळे भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटाची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे.

chhagan bhujbal | sharad pawar
Video Chhagan Bhujbal : भुजबळ अजितदादांचं 'घड्याळ' सोडून ठाकरेंची 'मशाल' हाती घेणार?

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण देखील दिले आहे. अशा स्थितीत भुजबळ यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे निकटवर्तीय देखील सध्या अस्वस्थ असल्याचे लपून राहिलेले नाही.

chhagan bhujbal | sharad pawar
Chhagan Bhujbal : संजय राऊतांशी भेट झाली? छगन भुजबळांनी कधी काय झालं, ते सगळंच सांगितलं

भुजबळ हे त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. महायुती सरकारमध्ये देखील त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याबाबत एकट्याने निर्णय घेणे शक्य झाले नव्हते. अशा स्थिती सध्या भारतीय जनता पक्ष हा एकमेव पर्याय भुजबळ यांच्यापुढे असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com