

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्षांहून अधिक काळ उलटला असला, तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. मित्रपक्षांतील मतभेदांमुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. आता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न निकाली निघण्याची चर्चा सुरू असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
येत्या १५ ऑगस्टपूर्वी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी करणारे बॅनर लावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे रायगडमध्येही पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी योग्य आहे. मात्र अंतिम अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील."
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे सर्व घटक पक्षांशी समन्वय साधून निर्णय घेतात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रितपणे निर्णय घेतील.
यावेळी बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय निवृत्तीबाबतच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. "पंकजाताई कोणत्या संदर्भात बोलल्या हे मला माहिती नाही. मात्र त्या असा विचार करतील, असे मला वाटत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारने काँग्रेसच्या तुलनेत अधिक सकारात्मक निर्णय घेतल्याचा दावा केला. ओबीसी समाजाच्या अतिरिक्त मागण्यांचाही सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.