Manikrao Kokate : कृषी मंत्र्यांना मोठा दिलासा; शिक्षेला स्थगिती, आमदारकीही वाचली

Nashik News : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. सदनिका खरेदी फसवणूक प्रकरणात त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात अपिल केले होते. यात 24 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच त्यांना जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर याबाबत सविस्तर सुनावणी घेत शिक्षेच्या स्थगितीचा निर्णय राखून ठेवला होता. याबाबत आज (5 मार्च) सुनावणी पार पडली. यात शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे कोकाटे यांच्या आमदारकीला आता कोणताही धोका असणार नाही. तसेच त्यांचे मंत्रिपदही वाचू शकणार आहे. कोकाटे यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादीला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही हा मोठा दिलासा आहे.

Manikrao Kokate
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सहा महिन्यांनंतर पुन्हा मंत्री होणार; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

कोकाटे यांच्यावर काय होते आरोप?

सिन्नर शहरातील येवलेकर मळा या उच्चभ्रू परिसरातील नागरी कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत अतिरिक्त जमिनीवर सदनिका बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये केवळ आर्थिक दुर्बल आणि घर नसलेल्या व्यक्ती अशी पात्रता होती. त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्बल असल्याचे शासनाला सांगितले होते.

Manikrao Kokate
Santosh Deshmukh Murder : बीड कडकडीत बंद; मुंडे, कराडविरोधात राज्यभर संतापाचा वणवा

यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तत्कालीन आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता. यादरम्यान, 30 नोव्हेंबर 2019 मध्ये दिघोळे यांचे निधन झाले. पण त्याचा निकाल नुकताच लागला. यात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com