Sanjay Raut Politics : राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत यांचे भाष्य; मंत्री भुजबळांविषयी केला मोठा दावा...

Maharashtra Rajya Sabha Election News : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महायुतीत टाकला राजकीय खडा.. महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Sanjay Raut addressing media on Maharashtra Rajya Sabha elections and speculating about Chhagan Bhujbal’s possible candidature.
Sanjay Raut addressing media on Maharashtra Rajya Sabha elections and speculating about Chhagan Bhujbal’s possible candidature.Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Election News : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात महायुतीमध्ये देखील मोठ्या घडामोडी होण्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वेगळाच दावा केला आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जावे असा एक मतप्रवाह आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून डावपेच आखले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकतीच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका चर्चेत आहे.

या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ते म्हणाले राज्यसभा सभागृह हे जेष्ठांचे मानले जाते. तेथे 92 वर्षाचे देवेगौडा हे देखील आहेत. त्या दृष्टीने आम्ही बरेच तरुण आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांची नियुक्ती होईल असा अंदाज आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात हालचाली होत आहेत.

मात्र संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास उत्सुक आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राज्यसभा ही ज्येष्ठांसाठीच असते, असा टोमणाही त्यांनी मारला.

Sanjay Raut addressing media on Maharashtra Rajya Sabha elections and speculating about Chhagan Bhujbal’s possible candidature.
Sanjay Raut Politics: भुसे विरुद्ध राऊत खटल्यात समझोता, मात्र जाता जाता राऊत यांनी भाजपला गुंडाळले!

भुजबळ यांना फार पूर्वीपासून दिल्लीत जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी दोन वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. शिवसेनेने त्यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut addressing media on Maharashtra Rajya Sabha elections and speculating about Chhagan Bhujbal’s possible candidature.
Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?

राज्यसभेवर सहा जागांसाठी महायुतीकडे बहुमत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेचे एक जागा या पक्षासाठी उपलब्ध आहे. अशातच राऊत यांनी भुजबळ यांच्या विषयी राज्यसभेविषयी दावा केल्याने महायुतीत त्यांनी राजकीय वादाचा खडा टाकून तर पाहिला नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com