मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. अखेर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याचे एनसीबीने जाहीर केले आहे. यासाठी वानखेडे हे आज तातडीने एनसीबीच्या दिल्लीतील मुख्यालयात दाखल झाले होते. आता वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक उद्या मुंबईत दाखल होत आहे.
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांना काल (ता.25) सायंकाळी तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. आज त्यांना एनसीबीच्या मुख्यालयात हजेरी लावली. याचवेळी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून उद्या (ता.27) मुंबईत दाखल होणार आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी असतील. वानखेडेंवरील आरोपांची चौकशी हे पथक करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीतील आर.के.पुरम भागातील एनसीबीच्या मुख्यालयात वानखेडे हे आज दाखल झाले. मात्र, पुढील दार टाळून मागील दाराने वानखेडे यांनी मुख्यालयात जाणे पसंत केले. एनसीबीचे महासंचालक एस.एन.प्रधान यांची वानखेडे यांनी भेट घेतल्याचे समजते. एनसीबीकडून आढावा बैठकीसाठी वानखेडेंना बोलावल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात त्यांची चौकशी झाल्याचे समोर येत आहे. वानखेडे तब्बल दोन तासांनी एनसीबीच्या मुख्यालयातून बाहेर पडले. ते आता मुंबईला रवाना झाले आहेत.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह (Gyaneshwar Singh) यांनी चौकशी सुरूच झाला नसल्याचा दावा आज केला. ज्ञानेश्वरसिंह यांनी वानखेडेंची चौकशी सुरू झाल्याचे काल म्हटले होते. आज मात्र, त्यांनी उलट भूमिका घेत ही चौकशी सुरूच झाली नसल्याचे म्हटले आहे. वानखेडेंच्या चौकशीबाबत ज्ञानेश्वरसिंह यांना आज विचारणा केली असता त्यांनी वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले की, मी कुणालाही आज बोलावले नव्हते. मला जर त्यांची चौकशी करायची असती तर मी त्यांना कॉल केला असता.
वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.