आरोप फेटाळले, मात्र प्रभाकरचे अॅफिडेविट एनसीबीच्या महासंचालकांना पाठवणार

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावीच्या बॉडीगार्डने केलेल्या गंभीर आरोपांनंतर खळबळ उडाली आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) बॉडीगार्डने केलेल्या गंभीर आरोपांनंतर खळबळ उडाली आहे. आर्यन खानला एनसीबीच्या (NCB) कार्यालयात नेल्यानंतर काही तासांनी किरण गोसावी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मॅनेजरला भेटला होता. यावेळी त्यांच्यात एक डील झाल्याचा खुलासा गोसावीच्या बॉडीगार्डने केला आहे. या डीलमधील पैसे समीर वानखेडे यांनाही जाणार होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. मात्र हे सर्व आरोप सध्या वानखेडे यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांच्याद्वारे हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुथा अशोक जैन यांच्या या पत्रकात म्हंटले आहे की, प्रभाकर प्रभाकरचे अॅफिडेविट समाजमाध्यमांमधून फिरत आहे. हे अॅफिडेविट आम्ही पाहिले. पण ही केस सध्या माननीय न्यायालयासमोर असून याबाबत त्यांना जे काही म्हणावे न्यायालयात म्हणावे. मात्र प्राथमिकतः हे आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि समीर वानखेडे यांच्याकडून फेटाळण्यात लावण्यात येत आहेत. पण यातील काही कंटेट हा पडतळणीची गरज आहे, त्यामुळे कार्यवाहीसाठी हे अॅफिडेविट एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत आहे. याबाबत आता एनसीबीकडून पत्रकार परिषद देखील होणार आहे.

काय आरोप केले आहेत प्रभाकरने?

गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने (Prabhakar Saeel) व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आर्यनला ताब्यात घेतेल त्या रात्री आम्ही एनसीबीच्या कार्यालयाकडून लोअर परेलच्या दिशेने गेलो. तिथे एका पुलाखाली आमची गाडी थांबली. आमच्यामागे निळ्या रंगाची मर्सिडीज थांबली. त्या गाडीत एसआरकेची मॅनेजर होती. त्यानंतर गोसावी व सॅम सोबत त्यांची मिटींग झाली. त्यामध्ये काय झाले ते त्यावेळी मला कळलं नाही. पण गाडीतून त्यांनी परत फोन केला. 25 चा बाँड टाक, लास्ट 18 ला कर. कारण 8 समीर वानखेडेंना जाणार आहेत. आणि 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असं ठरल्याचं प्रभाकर याने म्हटलं आहे. हे आकडे कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.

Sameer Wankhede
किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक; गोसावी मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकणात पंच

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुझवर छापेमारी करत आर्यनसह काही जणांना अटक केली. यावेळी त्यांनी ज्या पंचाच्या सह्या घेतल्या आहेत, त्यामध्ये गोसावीसह प्रभाकरचंही नाव आहे. प्रभाकरच्या अॅफिडेविटमध्ये याबाबतचे खुलासे करण्यात आले आहे.

आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर काही वेळाने गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे एका निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दडलानी हिला दोघे भेटले. त्यामध्ये त्यांची बोलणी झाली. त्यानंतर गोसावीसह आम्ही दोघे वाशीच्या घरी गेलो. सकाळी पुन्हा ताडदेवला इंडियाना हॉटेलजवळ प्रभाकर आला. तिथे एका गाडीतून 50 लाख रुपये घेऊन पुन्हा वाशीला आल्याचा खुलासा प्रभाकरने केला आहे.

Sameer Wankhede
अशी झाली डील; समीर वानखेडेंना 'आठ' तर गोसावी व सॅमला 'दहा' जाणार होते!

प्रभाकर 50 लाख घेऊन गोसावीला वाशीतील इनऑरबीट मॉलजवळ गेला. तेथून गोसावीने पून्हा पैशाची पिशवी प्रभाकर कडे देऊन ती सॅमला देण्यास सांगितली. त्यानुसार प्रभाकर पैसे घेऊन सॅमकडे गेला. पण त्यावेळी पिशवीत 38 लाख रुपयेच होते. त्यातील 12 लाख नव्हते, असा खुलासाही प्रभाकरने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com