Kolhapur Politics: राष्ट्रवादीची भाजपसोबत कुठे दोस्ती, कुठे कुस्ती? स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी

NCP Alliance with BJP: चारच नगरपालिकांमध्ये पक्ष स्वबळावर लढत आहे. कागल, मुरगूडमध्ये 'राष्ट्रवादी ने शाहू आघाडीशी हात मिळवणी केली आहे. उवरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये या पक्षांच्या कार्यकत्याना आधार घ्यावा लागला आहे.
Kolhapur BJP
Kolhapur BJPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात ही लढत महायुतीमधील अंतर्गत घटक पक्षात होताना दिसत आहे.

पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कुठे भाजपला बाजूलाच ठेवत, तर कुठे अप्रत्यक्षपणे जोडले आहे. जिल्ह्यातील हुपरी, गडहिंग्लज, हातकणंगले, मलकापूर, कागल, मुरगुड अशा सहा नगरपालिका आणि चंदगड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षााच्या घड्याळ चिन्हाची टिकटिक सुरू राहणार आहे. तर कागल, चंदगड, मुरगूड,गडहिंग्लज, हातकणंगले या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला आहे.

चारच नगरपालिकांमध्ये पक्ष स्वबळावर लढत आहे. कागल, मुरगूडमध्ये 'राष्ट्रवादी ने शाहू आघाडीशी हात मिळवणी केली आहे. उवरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये या पक्षांच्या कार्यकत्याना आधार घ्यावा लागला आहे. महायुती समवेत जाण्याची भूमिका योग्य असल्याचे पटवून देत विधानसभा निवडणुकीत कागलच्या जागेबरोबर आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व टिकविण्यात आमदार हसन मुश्रीफ यांना यश मिळाले. पण, पक्षाच्या बालेकिल्ल्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेला चंदगड मतदारसंघ कायम राखण्यात अपयश आले.

पक्षाचे ८६ उमेदवार रिंगणात

राष्ट्रवादीचे जिल्ह्मातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८६ उमेदवार उतरले आहेत. त्यापैकी ८० जण नगरसेवक पदासाठी लढत आहे. त्यात सर्वाधिक १९ उमेदवार गडहिंग्लज, १७ मुरगूडमध्ये आणि त्यापाठोपाठ कागलमध्ये १४, तर हातकणंगलेमध्ये १२ उमेदवारांचा समावेशआहे. कागल, मुरगूड, हुपरी, गडहिंग्लज, हातकरणंगले आणि चंदगडमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षाचे उमेदवार लढणार आहेत.

Kolhapur BJP
Ravindra Chavan: ठाकरेंबंधूंचा आक्षेप खरा ठरला! आता भाजप प्रदेशाध्यक्षही संतापले; निवडणूक अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

लोकसभापाठोपाठ विधानसभेतील कामगिरी पाहता जिल्ह्यात पक्ष संघटन भक्कम करण्यासाठी इथल्या पदाधिकारयांनी जोमाने सभासद नोंदणी मोहीम राबविली. त्याच्याजोरावर नगरपालिका निवडणुकांमध्ये 'राष्ट्रवादी' स्वबळाचा नारा देत लढणार असल्याचे वाटत होते. मात्र, कशाबशा चारनगरपालिकांमध्ये पक्ष स्वबळावर लढत आहे. त्यात हूपरी, गडहिंग्लज, हातकणंगले, मलकापूरचा समावेश आहे.

उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाडी, युती करण्याची वेळ पक्षावर आली आहे. त्यातही चंदगडमध्ये राष्ट्वादी शरदचंद्र पवार पक्षासमवेत हातमिळविणी करावी लागली आहे.

पेठवडगाव, जयसिंगपूर, पन्हाळा, कुरुंदवाड, आजरा याठिकाणी 'घड्याळ' दिसणार नाही. विधानसभा निवडणुकीतील स्थिती पाहता एकूणच भुदरगड, राधानगरीत पक्षाचा प्रभाव कमी झला आहे. कागल, चंदगडवगळता हातकणंगलेसह अन्य तालुक्यांत नावापुरते अस्तित्व आहे. गेल्या वर्षभरात पक्ष संघटनेची फेरबांधणी कितपत भक्कम झाली आहे. त्यावर नगरपालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी दिसणार आहे.

राजकीय समीकरणे बदलली नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने चंदगडमध्ये राष्ट्वादीचे (अजित पवार गट) माजी आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नंदिनी बाभूळकर यांच्यात युती झाली. तेथून जिल्हात राजकीय समीकरण बदलाचे वारे वेगाने वाहू लागले. पुढ़े ते कागल, मुरगूडमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहूग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या ऐतिहासिक युती झाली. त्यानंतर सोयीप्रमाणे 'राष्ट्रवादीने (अजित पवार गट) स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com