NCP delegation: राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ CM फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय घडामोडीवर करणार चर्चा

Political News : आता राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी पोहचले आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बारामती विमानतळाजवळील अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी पोहचले आहे. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे. हे तिघेजण सीएम फडणवीस यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.

बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना गुरुवारी दुपारी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये विविध विषयवार चर्चा करण्यात आली असल्याचे समजते.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Death : नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेचा गटनेता ठरला; अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी दुःखात, निवड अद्याप नाही

त्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिष्टमंडळ सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी पोहचले आहे. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे. हे तिघेजण सीएम फडणवीस यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Death : नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेचा गटनेता ठरला; अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी दुःखात, निवड अद्याप नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे समजते. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासंदर्भात दुपारी माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली असून आता भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीने निर्णय घ्यायचा यावर निर्णय येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com