Ncp News : सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळ विरुद्ध तटकरेंमध्ये 'हायव्होल्टेज ड्रामा' : समीर भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीत उभी फूट?

NCP leadership clash News : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.
Chhagan Bhujbal, Sunil Tatkre
Chhagan Bhujbal, Sunil Tatkre Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलअंतर्गत धुसफूस आता थेट जाहीर व्यासपीठावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील शीतयुद्ध आता उघड वाक्युद्धात बदलले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतच दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला.

समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ कुटुंब नाराज असल्याची चर्चा आहे. ही नाराजी व्यक्त करताना भुजबळ यांनी इतरांची मुलं आमदार, खासदार, मंत्री आहेत, मलाही त्याचप्रमाणे न्याय मिळावा, असं म्हणत तटकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला होता. आता या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकीने राजकारण कमालीचे तापले आहे.

तटकरे यांनी भुजबळांच्या 'त्या' विधानाचा घेतला समाचार

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पक्षांतर्गत नाराजीवर बोलताना, "मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही," असे सूचक विधान केले होते. याचाच जाहीर समाचार घेत सुनील तटकरे यांनी भुजबळांना टोला लगावला. तटकरे म्हणाले, "छगन भुजबळ हे नक्कीच कबड्डीचे खेळाडू आहेत, सोबतच ते अभिनेते आणि निर्मातेही आहेत.

Chhagan Bhujbal, Sunil Tatkre
Sameer Bhujbal: मंत्रिपद नाकारलं, काकांना राज्यसभेला डावललं... तरीही समीर भुजबळांकडून भाजपचं भरभरून कौतुक

भुजबळ यांनी कबड्डीत एक-एक करून अनेक खेळाडू बाद केले आहेत आणि कधीकधी ते एकाच वेळी सगळ्यांना बाद करतात. पण, शिवसेनेत (Shivsena) असताना त्यांनी दोनवेळा महापौरपद मिळवले, तेव्हा त्यांनी कोणाला चेकमेट केले होते?" असा थेट सवाल तटकरे यांनी केला. तसेच आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू असून हे सर्व खेळाडू अजितदादांनीच तयार केल्याचे त्यांनी सुनेत्रा पवारांसमोर स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal, Sunil Tatkre
Sameer Bhujbal : मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाबाबत काय सांगितलं होतं? : समीर भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी...

'राजकारणाचा खेळ करू नका'; छगन भुजबळांचा थेट पलटवार

सुनील तटकरे यांच्या या टीकेनंतर छगन भुजबळ यांनीही आक्रमक पवित्रा घेत व्यासपीठावरूनच सडेतोड उत्तर दिले. भुजबळ म्हणाले, "पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. मगापासून चालले आहे हा खो-खो खेळतो, तो कबड्डी खेळतो, हा बुद्धिबळ खेळतो. अरे बाबांनो, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका! पक्ष म्हणजे फक्त झेंडा, ऑफिस किंवा वरील बोर्ड नाही, तर पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे."

Chhagan Bhujbal, Sunil Tatkre
Chhagan Bhujbal : रोज विलिनीकरण, विलिनीकरण काय लावले? भुजबळ संतापले, म्हणाले इतकी घाई..

पदे म्हणजे अळवावरचे पाणी : भुजबळ

आपल्या भाषणात भुजबळांनी तटकरे यांचे नाव घेता बरेच काही सुनावले. "नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणतीही पदे असो, ती अळवावरच्या पाण्यासारखी असतात; कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही. माणसाचा केवळ कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. संघर्ष हा आपला वारसा आहे," असे म्हणत त्यांनी ज्या निष्ठा अजितदादांच्या चरणी वाहिल्या, त्याच आता सुनेत्रा वहिनींच्या चरणी वाहणार असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com