Rohini Khadse : 'माझ्या वडिलांना काय विचारता? तुमच्या वरिष्ठांना..., तुम्ही चार पक्ष..', रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना करारा जवाब

Rohini Khadse on Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभागृहातील वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नेते विधान परिषद आमदार अनिल परब यांना उद्देशून चित्रा वाघ यांनी हातवारे करत, तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ असे म्हटलं होते.
Rohini Khadse And Chitra Wagh
Rohini Khadse And Chitra Waghsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत दिशा सावियान मृत्य प्रकरणावरून वाद उफाळला होता. यादरम्यान चर्चा सुरू असताना सभागृहात भाजप आमदार आमदार चित्रा वाघ आणि आमदार अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. चित्रा वाघ यांनी अनिल परबांसारखे 56 पायाला बांधून फिरते, असे वक्तव्य करताना, परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला मी ठोकत असते. आता आत्ता उत्तर दिलं आहे. परत माझ्या वाट्याला गेल्यात तर ठोकून काढू. तुमची नीच प्रवृत्त कधी थांबणार?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे देखील नाव घेतलं होतं. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून चित्रा वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला होता. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना टोला लगावत टीका केली आहे.

विधान परिषदेत चित्रा वाघ यांनी ज्या पद्धतीने वाद घातला. तसेच अनिल परब यांच्या टीकेला उत्तर दिले. त्यावरून आता हा वाद वाढताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर देखील आमदार अनिल परब यांना टार्गेट करत जळजळीत टीका केली होती. तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे देखील नाव घेतलं होतं. ते माझ्या समोर बसतात. त्यांनी विचारा असे म्हटलं होतं. त्यावरून रोहिणी खडसेंनी पलटवार केला आहे. तर आपण कोणावर बोलतो याचे भान ठेवून बोला. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असं नको, असा खोचक सल्ला दिला आहे.

याचबरोर रोहिणी खडसे यांनी, चित्रा वाघ यांचा समाचार घेताना एक्सवर एक पोस्ट करत भाजप वाढवण्यात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा हात आहे. पण त्यांनी कधीच आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलताना किमान 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची माहिती घ्या. माझे वडिल ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय? याची माहिती घेऊन बोला. ती घेण्यात आपण कमी पडलात तर वरिष्ठ नेत्यांना विचारा आणि मगच बोला, असंही सुनावलं आहे.

Rohini Khadse And Chitra Wagh
Rohini Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी रोहिणी खडसेंना वेगळाच संशय; म्हणाल्या...

तर मला पक्षाने माझ्या कर्तत्वावर आणि 20 ते 25 वर्षांच्या कष्टामुळे आमदार केलं आहे. मी कोणाच्या शिफारशीने येथे आले नाही, अशी टीका केली होती. या टीकेवर देखील रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देताना, चित्रा वाघ तुम्ही चार पक्ष फिरून आला आहात. विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात. त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात‌, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. हवं तर तुमच्या वरिष्ठांना विचारा. शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे.

दिशा सालियन प्रकरणात आमदार अनिल परब यांच्यावर झालेल्या टीकेवर देखील रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. ज्यात त्यांनी, ‘बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!’, असा टोला लगावत टीका केली आहे.

Rohini Khadse And Chitra Wagh
Chitra Wagh Controversy : म्हणे, असे 56 पायाला बांधून फिरते...! वरिष्ठांच्या सभागृहाने शरमेने मान खाली घातली असणार

तर चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खूश करण्यासाठी सभागृहात हा आकांडतांडव केला? असा देखील सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी सभागृहात, रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात. आता त्यांनी त्यांनाच विचारावं असे म्हटलं होते. त्यावरून आता रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com