Maharashtra News : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'चुम्मा चुम्मा' पुरस्काराचे मानकरी कोण आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा, असे रोहिणी खडसे यांनी सुनावले आहे.
देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा समावेश झाला आहे. त्यावरून शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी सुळेंवर सोशल मीडियावरून (Social Media) बोचरी टीका केली आहे. ‘10 एकरात 110 कोटींची वांगी… हा तर चक्क कृषीक्षेत्रातला वैज्ञानिक शोध… वांगीसम्राज्ञी नामक एक पुरस्कारही लवकरच दिला पाहिजे’, असे शीतल म्हात्रे खवचटपणे बोलल्या होत्या.
म्हात्रे यांच्या या खवचट टीकेवर रोहिणी खडसे यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिल्याचा टोला खडसे यांनी लगावला आहे. सोशल मीडियात लांबलचक पोस्ट लिहित खडसे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय म्हटले आहे रोहिणी खडसेंनी?
आदरणीय सुप्रियाताईंबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही. परंतु स्वतःवर आले की, त्यांना महिला सबलीकरण आठवते. शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी! त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःमध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा, RTI टाका माहिती घ्या, नंतर आपले पिसाळे तोंड उघडा, या शब्दांत रोहिणी खडले यांनी शीतल म्हात्रे यांचा समाचार घेतला आहे.
आदरणीय सुप्रियाताईंवर टीका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा खडसे यांनी दिला आहे. 'चुम्मा चुम्मा' पुरस्काराचे मानकरी कोण आहे, हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा, अशा शब्दांत खडसे यांनी म्हात्रे यांनी खडसावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.