Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला सोलापूरच्या नेत्याचा विरोध; म्हणाले, ‘तो निष्ठावंतांवर अन्याय ठरेल’

Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा घेऊ नये, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखे होईल.
Uttam Jankar-Ajit Pawar
Uttam Jankar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्रतेची सुनावणी यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील काही आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे, ते पुन्हा स्वगृही (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात) परतण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे.

पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा घेऊ नये, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, अशा शब्दांत धनगर समाजाचे माळशिरसमधील नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध दर्शविला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटातील माजी आमदार बाबाजानी दुरानी हे दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वगृही परतले आहेत. तसेच, आणखी काही नेत्यांच्या नावाची चर्चा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत होत आहे.

गेली काही दिवसांपासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबाबत तशीच चर्चा होती. मात्र त्यांनी आज सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपण अजितदादांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. या सर्व घडामोडींबाबत बोलताना उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध केला आहे.

Uttam Jankar-Ajit Pawar
Bacchu Kadu : भावी मुख्यमंत्र्याच्या यादीत आता बच्चू कडूंची भर; सोलापुरात झळकले बॅनर

राज्याला जेव्हा आग लागली होती, तेव्हा हा बिबट्या पळून गेला होता. आता जंगलाची आग मतरुपी पावसाने आटोक्यत येत आहे. त्यामुळे बिबट्या पुन्हा शिकारीसाठी परत आला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर तो अन्याय ठरेल, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

Uttam Jankar-Ajit Pawar
Angar Upper Thasil Office : राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत गोंधळ; ‘अनगरला अप्पर तहसील नेण्याचं कारण काय,’ महिलेने विचारला जाब

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरूनही उत्तम जानकर यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ही लाडकी बहिण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे, असे जानकर यांनी म्हटले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या संभ्रमाची परिस्थिती आहे. मात्र या वादावरही ज्येष्ठ नेते शरद पवार हेच तोडगा काढू शकतात, असा विश्वासही उत्तम जानकर यांनी वेळी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com