MVA News : ''...तेव्हा सगळंच माझं म्हणून चालत नसतं!''; राष्ट्रवादीच्या आमदारानं आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले

Rohit Pawar News: ...पण जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना माघार घ्यावी लागेल.
MVA News
MVA NewsSarkarnama

Mumbai : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं जाहीर तर केलं. पण जागा वाटप करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर कायम आहे. यातच संजय राऊतांनी केलेला १९ जागांवरील दावा, अजित पवारांचं आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ हे विधान तर काँग्रेसच्या पटोलेंनी मेरिटनुसार त्या त्या जागांबाबत निर्णय घेतले जातील असं विधान केलं होतं. यावर आता आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे.

रोहित पवार(Rohit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील लोकसभेसाठीच्या जागावाटप हा तडजोडीचा भाग आहे. आता सगळे सगळ्या जागांवर दावा करतील. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा माघार घ्यावी लागेल. ज्यावेळी तीन पक्ष एकत्र असतील तेव्हा सगळंच माझं म्हणून चालत नसतं असंही पवार यांनी यावेळी म्हटलं.

MVA News
Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादीकडून 'ईडी'चा निषेध; 'जयंत पाटील स्वच्छ प्रतिमेचे नेते...'

जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवार म्हणाले...

आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलां(Jayant Patil)च्या ई़डी कारवाईवर भाष्य केलं. पवार म्हणाले, जयंत पाटलांवर जी कारवाई केली जात आहे. कर्नाटक निकालानंतर हे होईल हे साहजिक होतं. एकावरच थांबेल का प्रश्न आहे. पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे. महाराष्ट्रात मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे असंही पवार म्हणाले.

पवारांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून ही कारवाई झाली असं मी म्हणणार नाही. पण ती राष्ट्रवादीच्या नेत्यावर झाली आहे. यामुळे काही लोक घाबरतील अशी अपेक्षा असेल तर तास होणार नाही. पवारांना पत्र आलं तेव्हाही कार्यकर्तेच रस्त्यावर होते. नेते संपर्कात होते. नेते नाहीत म्हणजे पाठिंबा नाही अशी चर्चा मीडियामधून विरोधक करत आहेत. ती हास्यास्पद गोष्ट आहे असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

MVA News
Neera Bazar Samiti : अजितदादांकडून निष्ठावंतास न्याय : नीरा बाजार समिती सभापतीपदी जगताप बिनविरोध; उपसभापतीवरून घोळ

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीतील सभापती उपसभापतीच्या निवडणुकीवर भाष्य करताना म्हणाल्या, तेथील स्थानिक भाजप नेत्यांना अहंकार आहे. पण तिथे महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा निर्धारही पवार यांनी बोलून दाखवला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com